पाकिस्तानमधूनच दहशतवाद्यांना फंडिंग; जम्मू-काश्मिरात 12 ठिकाणी धाड

राज्यातील गुन्हे शाखेने (एसआयए) दहशतवाद्यांना फंडिंग प्रकरणात भद्रवाह येथे एपीएचसी पाकिस्तानचे अध्यक्षांच्या घरासह 12 ठिकाणी छापेमारी केली. या प्रकरणी गांधीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता त्यानंतर या गुन्ह्याचा तपास शाखेकडे सोपविण्यात आला होता(Funding terrorists from Pakistan; Raids at 12 places in Jammu and Kashmir).

    जम्मू : राज्यातील गुन्हे शाखेने (एसआयए) दहशतवाद्यांना फंडिंग प्रकरणात भद्रवाह येथे एपीएचसी पाकिस्तानचे अध्यक्षांच्या घरासह 12 ठिकाणी छापेमारी केली. या प्रकरणी गांधीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता त्यानंतर या गुन्ह्याचा तपास शाखेकडे सोपविण्यात आला होता(Funding terrorists from Pakistan; Raids at 12 places in Jammu and Kashmir).

    तपास यंत्रणेने पोलिसांच्या मदतीने जम्मू, कठुआ, डोडा आणि काश्मिरातील डझनभर ठिकाणी छापेमारी केली. पथकाने भद्रवाह येथील मशिद मोहल्ला भागात एका घराची झाडाझडतीही घेतली. यासोबतच इलेक्ट्रॉनिक उत्पादनांची विक्री करणाऱ्या एका व्यक्तीच्या घरावर तसेच दुकानावरही छापा टाकण्यात आला.

    येथील जुबैर याचे वडील हुसैन खतीब गेल्या 20 वर्षांपासून पाकिस्तानात आहेत. ते प्रतिबंधित दहशतवादी संघटना हिज्बुल मुजाहिद्दीनशी संबंधित असल्याचे सांगितले जाते. जुबैरच्या दुकानातून यंत्रणेने एक वायफाय राउटरही जप्त केला.

    एनआयएचे आरोपपत्र दाखल

    दहशतवाद्यांना फंडिंग प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) एका प्रकरणात न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. या प्रकरणात तपास यंत्रणेने दहशतवाद्यांच्या तीन सहकाऱ्यांना गेल्या वर्षी अटक केली होती व त्यांच्याकडून 43 लाखांची रोख रक्कम जप्त केली होती. ही कारवाई सिधरा पूल भागात करण्यात आली होती. जप्त केलेली रक्कम पंजाबातून दक्षिण काश्मिरात पुरविला जाणार होता.