धावत्या वाहनात महिला, ६ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला आपल्या मुलीसह पिरान कालियार या मुस्लिम धार्मिक स्थळावरून रात्री परतत असताना सोनू नावाच्या व्यक्तीने तिला लिफ्ट दिली. त्या गाडीत सोनूचे काही मित्रही बसलेले होते.

    नवी दिल्ली – उत्तराखंडमधील हरिद्वार जिल्ह्यातील रुडकी येथे एका महिलेवर आणि तिच्या सहा वर्षांच्या मुलीवर धावत्या कारमध्ये सामूहिक बलात्कार करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका व्यक्तीने आणि त्याच्या मित्रांनी दोघींना लिफ्ट देण्याच्या बहाण्याने कारमध्ये बसवले होते.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला आपल्या मुलीसह पिरान कालियार या मुस्लिम धार्मिक स्थळावरून रात्री परतत असताना सोनू नावाच्या व्यक्तीने तिला लिफ्ट दिली. त्या गाडीत सोनूचे काही मित्रही बसलेले होते.

    पोलिस अधीक्षक प्रमेंद्र डोवाल यांनी सांगितले की, महिलेच्या आरोपानुसार, सोनू आणि त्याच्या मित्रांनी महिला आणि मुलीवर बलात्कार केला आणि दोघींनाही एका कालव्याजवळ सोडून दिले. मध्यरात्री या महिलेने कसेतरी पोलीस ठाणे गाठून पोलिसांना घटनेची माहिती दिली.