
ब्लूमबर्ग बिलियनेअर इंडेक्सनुसार, मंगळवारी अदानीची एकूण संपत्ती $9.6 दशलक्षने वाढली आणि ती आता $84.5 बिलियनवर पोहोचली आहे. हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालापूर्वी अदानी जगातील श्रीमंतांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर होते. अमेरिकन फर्मने गेल्या आठवड्यात बुधवारी एका अहवालात दावा केला की, अदानी समूह अनेक दशकांपासून स्टॉक हेराफेरी आणि खात्यातील फसवणुकीत गुंतला आहे.
नवी दिल्ली: अमेरिकन शॉर्ट सेलिंग फर्म हिंडेनबर्ग रिसर्चच्या सुनामीतून अदानी समूह सावरत आहे. तीन दिवसांच्या मोठ्या तोट्यानंतर मंगळवारी समूहाचे बहुतांश शेअर्स तेजीत होते. त्यामुळे समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांच्या संपत्तीतही वाढ झाली असून ते पुन्हा एकदा जगातील टॉप 10 श्रीमंतांच्या यादीत सामील झाले आहेत.
अदानीची एकूण संपत्ती $9.6 दशलक्षने वाढली
ब्लूमबर्ग बिलियनेअर इंडेक्सनुसार, मंगळवारी अदानीची एकूण संपत्ती $9.6 दशलक्षने वाढली आणि ती आता $84.5 बिलियनवर पोहोचली आहे. हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालापूर्वी अदानी जगातील श्रीमंतांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर होते. अमेरिकन फर्मने गेल्या आठवड्यात बुधवारी एका अहवालात दावा केला की, अदानी समूह अनेक दशकांपासून स्टॉक हेराफेरी आणि खात्यातील फसवणुकीत गुंतला आहे. यामुळे अदानी समूहाच्या शेअर्समध्ये तीन दिवस मोठी घसरण झाली आणि त्याचे मार्केट कॅप $75 बिलियनने कमी झाले. मात्र, अदानी समूहाने हा अहवाल खोटारडेपणाचा असून एफपीओसमोर बदनाम करण्याचा हा डाव असल्याचे म्हटले आहे.
समूहाच्या बहुतांश कंपन्यांच्या भावात तेजी
मंगळवारी अदानी समूहाच्या बहुतांश कंपन्यांच्या भावात तेजी आली. समुहातील 10 कंपन्यांपैकी सात कंपन्यांचे भाव तेजीने बंद झाले तर तीन लोअर सर्किटला धडकले. समूहाची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्रायझेसचे समभाग 3.35 टक्क्यांनी वधारले. त्याचप्रमाणे, अदानी ट्रान्समिशन 3.73 टक्के, अदानी ग्रीन एनर्जी 3.06 टक्के, अदानी पोर्ट्स 2.67 टक्के, अंबुजा सिमेंट्स 3.50 टक्के, एसीसी लिमिटेड 3.39 टक्के आणि एनडीटीव्ही 1.35 टक्के वाढले. दुसरीकडे, अदानी टोटल गॅस 10 टक्क्यांनी, अदानी विल्मार आणि अदानी पॉवर पाच टक्क्यांनी घसरले.