इस्रायलचं पॅलेस्टाईनला जोरदार प्रत्तुत्तर! हवाई हल्ल्यात गाझाची सर्वात मोठी इमारत जमीनदोस्त, व्हिडिओ व्हायरल

इस्रायली हवाई दलाने एका निवेदनात म्हटले आहे की त्यांच्या युद्धविमानांनी गाझामधील दोन उंच इमारतींवर हल्ला केला. तेथे हमासचे लढवय्ये आणि हल्ल्याची उपकरणे उपस्थित असल्याचा आरोप त्यांनी केला.

    पॅलेस्टिनी सैनिक आणि इस्रायली सैन्य यांच्यात युद्ध (Israel Hamas War) सुरू आहे. इस्रायलने गाझा पट्टीवर केलेल्या हवाई हल्ल्यात गाझा शहराच्या मध्यभागी असलेला एक टॉवर जमीनदोस्त झाला आहे. हमासने हजारो रॉकेट डागल्यानंतर पॅलेस्टाईन टॉवरवर शनिवारचा हल्ला झाला. हा हल्ला थेट कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

    हा हल्ला झाला तेव्हा युमना एल्सायद पासजवळ अल जझीरा रिपोर्ट चालवला जात होता. हल्ला झाल्यानंतर आजूबाजूच्या सर्व इमारतींना मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यात कोणतीही जीवितहानी झाल्याची तात्काळ माहिती मिळालेली नाही.

    इस्रायली हवाई दलाने एका निवेदनात म्हटले आहे की, त्यांच्या युद्धविमानांनी गाझामधील दोन उंच इमारतींवर हल्ला केला. तेथे हमासचे आंतकवादी आणि हल्ल्याची उपकरणे असल्याचा आरोप त्यांनी केला.

    इस्रायलकडे जगातील सर्वात दाट लोकवस्ती असलेल्या गाझा पट्टीमधील निवासी इमारती आणि टॉवरवर हल्ले करण्याचा ट्रॅक रेकॉर्ड आहे. इस्रायल अनेकदा दाट लोकवस्तीच्या भागावर हल्ले करत असतो. त्यामुळे अनेक नागरिकांचे बळीही जात आहेत. इस्रायलने 2021 मध्ये गाझामध्ये 11 दिवस चाललेल्या युद्धात चार टॉवर्सना लक्ष्य केले होते. त्यातील तिन इमारत नष्ट झाल्या होत्या.

    शनिवारपासून सुरू आहे युद्ध

    इस्रायल आणि पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमासच्या दहशतवाद्यांमध्ये शनिवारपासून  सुरू असलेल्या युद्धातील मृतांची संख्या 1000 च्या वर गेली आहे. अमेरिका आणि फ्रान्सच्या नागरिकांचीही हत्या झाली आहे. शनिवारी हमासने इस्रायलवर पाच हजार रॉकेट डागले. इस्रायलमध्ये मोठ्या प्रमाणात दहशतवाद्यांनी घुसखोरी करून लोकांना ओलीस ठेवले. यानंतर इस्रायलने युद्धाची घोषणा केली आहे. इस्रायली हवाई दल बॉम्बफेक करून गाझा पट्टीतील हमासची जागा उद्ध्वस्त करत आहे.  इस्रायली सैनिक दहशतवाद्यांशी आमनेसामने लढत आहेत