
गेल्या काही दिवसांपासून 'द केरला स्टोरी' (The Kerala Story) या चित्रपटाची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहे. या चित्रपटानंतर पुन्हा एकदा 'लव्ह जिहाद'चा (Love Jihad) मुद्दा चर्चेत आला आहे. असे असताना मध्य प्रदेशातील इंदूरमधील (Indore Crime) एक तरूणी दोन दिवसांपूर्वीच बॉयफ्रेंडसोबत हा चित्रपट पाहण्यासाठी गेली होती.
इंदूर : गेल्या काही दिवसांपासून ‘द केरला स्टोरी’ (The Kerala Story) या चित्रपटाची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहे. या चित्रपटानंतर पुन्हा एकदा ‘लव्ह जिहाद’चा (Love Jihad) मुद्दा चर्चेत आला आहे. असे असताना मध्य प्रदेशातील इंदूरमधील (Indore Crime) एक तरूणी दोन दिवसांपूर्वीच बॉयफ्रेंडसोबत हा चित्रपट पाहण्यासाठी गेली होती. चित्रपट पाहिल्यानंतर तरुणी आणि तिचा बॉयफ्रेंड यांच्यात वाद झाला. त्यानंतर या तरुणीने थेट बॉयफ्रेंडविरोधात गुन्हा दाखल केला.
इंदूरमधील हारून कॉलनीत राहणाऱ्या मोहम्मद फैजान खान या तरुणाविरुद्ध तक्रार देण्यात आली. या तक्रारीनुसार, मोहम्मद याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या तरुणीची चार वर्षांपूर्वी मोहम्मद फैजान खान याच्याशी कोचिंग क्लासमध्ये ओळख झाली होती. दोघांची घट्ट मैत्री झाली. याचे रुपांतर प्रेमात झाले. काही कालावधीनंतर फैजानने तरूणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर फैजान हा या तरुणीला मुस्लिम धर्म स्वीकारण्यास भाग पाडत होता. त्यासाठी त्याने अनेकवेळा मारहाणही केली, अशी तक्रार या तरुणीने दिली. पोलिसांनी या तक्रारीच्या आधारे आरोपीविरुद्ध विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
‘लव्ह जिहाद’चा गुन्हा
तरुणीच्या तक्रारीवरून इंदूरच्या खजराना पोलिस ठाण्यात पोलिसांनी फैजान नावाच्या व्यक्तीविरुद्ध लव्ह जिहादचा गुन्हा दाखल केला आहे. फैजानने आपले खरे नाव लपवून तिच्याशी मैत्री केली आणि नंतर तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप तरुणीने केला आहे. मुलीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी फैजानला अटक केली.
‘द केरला स्टोरी’ पाहायले गेले अन्…
फैजानने पीडितेला लग्नाचे आमिष दाखवून फूस लावून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर आरोपी फैजान सतत पीडितेला मुस्लिम धर्म स्वीकारण्यास भाग पाडत होता. त्यानंतरच या दोघांमध्ये मोठं भांडण झाले, हे प्रकरण ‘द केरला स्टोरी’ हा चित्रपट पाहिल्यानंतर घडल्याचं सांगितलं जात आहे.