
जयपूरमध्ये प्रेयसीने प्रियकराची हत्या (Murder in Jaipur) केल्याची घटना समोर आली आहे. सिमेंटच्या ब्लॉकने डोक्यावर वार करून तिने प्रियकराची हत्या केली. त्यानंतर मृतदेह खोलीत टाकून ती मुलीसह पळाली. मानसरोवर पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी एसएमएस हॉस्पिटलच्या शवागारात ठेवला आहे.
जयपूर : जयपूरमध्ये प्रेयसीने प्रियकराची हत्या (Murder in Jaipur) केल्याची घटना समोर आली आहे. सिमेंटच्या ब्लॉकने डोक्यावर वार करून तिने प्रियकराची हत्या केली. त्यानंतर मृतदेह खोलीत टाकून ती मुलीसह पळाली. मानसरोवर पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी एसएमएस हॉस्पिटलच्या शवागारात ठेवला आहे.
एसएचओ (मानसरोवर) रणसिंग यांनी सांगितले, बिहारमधील रहिवासी अरविंद (35) याची हत्या करण्यात आली आहे. सुमारे आठवडाभरापूर्वी अरविंद हा मैत्रीण आणि तिच्या 7 वर्षाच्या मुलीसह जयपूरला आला होता. पितांबर नगर गजसिंगपुरा येथे भाड्याने खोली घेऊन राहू लागले. 19 ऑगस्टला रात्री झोपेत असताना अरविंद याच्या डोक्यात सिमेंटच्या ब्लॉकने वार करून त्यांची हत्या करण्यात आली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेला अरविंदचा मृतदेह पाहून त्याची प्रेयसी मुलीसह पळून गेली. त्यांच्या घरी अरविंदच्या मावशीचा मुलगा कल्याण उर्फ अनिल राहत होता.
अरविंदच्या खोलीचे दार 20 ऑगस्टच्या सायंकाळपर्यंत बंद होते. बाहेरून कुलूप नसल्याने कल्याण भेटायला गेला. गेट उघडून पाहिले असता, अरविंद रक्तबंबाळ अवस्थेत बेशुद्ध पडलेला आढळून आला. तर त्याची प्रेयसी मुलीसह बेपत्ता होती. त्याने फोन करून घरमालकाला याबाबत माहिती दिली. घरमालकाने रुग्णवाहिका बोलावून अरविंदला एसएमएस रुग्णालयात पाठवले. दरम्यान, उपचारापूर्वी डॉक्टरांनी अरविंदला मृत घोषित केले.