mayavati

महिला आरक्षणावर चर्चेत एससी, एसटी आणि ओबीसी महिलांना वेगळं आरक्षण ३३ टक्क्यांपेक्षा द्या, अशी मागणी मायावतींनी केलीय. त्यामुळं यावर देखील चर्चा होत आहे. SC, ST, OBC महिलांना आरक्षण विधेयकात सहभागी करावे, असं मायावती म्हणाल्या.

    नवी दिल्ली : नव्या संसद इमारतीमध्ये कामकाजाचा आजचा दुसरा दिवस आहे. त्यात लोकसभेत आज महिला आरक्षण विधेयकावर चर्चा होत आहे. कायदामंत्री अर्जुन मेघवाल यांनी लोकसभेत या विधेयकातील तरतुदींची माहिती दिली. त्यानंतर काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्या सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी महिला आरक्षण विधेयकाला (Women Reservation) काँग्रेस पाठिंबा देत असल्याची घोषणा केली. महिला आरक्षण हे राजीव गांधींचं स्वप्न होते असे म्हणत नारीशक्ती वंदना कायद्याला सोनीया गांधींनी पाठिंबा दिला आहे. परंतु आरक्षणासोबत जातनिहाय जनगणना देखील करण्यावर देखील मागणी त्यांनी केली आहे. तर सोनिया गांधी श्रेय घेत असल्याचा आरोप भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी केला.यावरुन गदारोळ झाला.  (Give separate reservation to SC, ST, OBC women, Mayawati’s demand, what did Supriya Sule, Sonia Gandhi say on the bill)

    SC, ST, OBC महिलांना वेगळं आरक्षण द्या

    दरम्यान, संसदेच्या नवीन इमारतीत काल महिला आरक्षणावरुन विरोधक व सत्ताधारा यांच्यात गदारोळ झाला. त्यामुळं काल कामकाज तहकूब करावे लागले. यानंतर आज दुसऱ्या दिवशी या विधेयकाला काँग्रेसनं पाठिंबा दिला. तर महिला आरक्षणावर चर्चेत एससी, एसटी आणि ओबीसी महिलांना वेगळं आरक्षण ३३ टक्क्यांपेक्षा द्या, अशी मागणी मायावतींनी केलीय. त्यामुळं यावर देखील चर्चा होत आहे. SC, ST, OBC महिलांना आरक्षण विधेयकात सहभागी करावे, असं मायावती म्हणाल्या. दरम्यान, मायावतींच्या मागणीवर सत्ताधारी काय उत्तर देतात हे पाहवे लागेल.

    महिलांची सहनशक्ती समुद्राएवढी

    सोनिया गांधी पुढे म्हणाल्या, भारतीय महिलांनी सर्वांच्या कल्याणासाठी काम केले आहे. स्त्रीच्या सहनशीलतेचा अंदाज लावणे खूप कठीण काम आहे. भारतीय महिलांनी कधीही तक्रार केलेली नाही. महिलांची सहनशक्ती समुद्राएवढी आहे. लवकरात सवकर आरक्षण लागू करावे. महिला आरक्षणासोबत जातनिहाय जनगणना देखील करा नाहीतर एससी आणि एसटींची संख्या कशी कळणार? तसेच लवकरात सवकर आरक्षण लागू करावे असे देखील त्या सोनीया गांधी यावेळी म्हणाल्या.

    सर्वच बहिणींचं नशीब चांगल नसतं

    सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत भाजपावर जोरदार हल्ला चढवला. भाजपाकडून महिलांचा सतत अपमान होत असल्याची टीका त्यांनी केली. त्यांच्या या वक्तव्यावरून नवी चर्चा रंगली आहे. सुप्रिया सुळे यांनी महिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा दर्शवला आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्यावरही संसदेत चर्चा व्हावी, अशी मागणी त्यांनी केली. बहिणींचं कल्याण बघेल असा भाऊ प्रत्येक घरात नसतो असं वक्तव्य खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत बोलताना केलं आहे. सर्वच बहिणींचं नशीब चांगल नसतं, असंही त्या म्हणाल्या.