म्हापसात गोबी मंचुरियनवर बंदी; ‘या’ कारणामुळे नगरपरिषदेने घेतला निर्णय

गोव्यातील म्हापसा शहरात स्टॉलवर आणि टेबलवर गोबी मंचुरियनवर बंदी घालण्यात आली आहे. गोबी मंचुरियनमध्ये कृत्रिम रंगाचा वापर केला जातो आणि स्टॉलवर पुरेशी स्वच्छता नसेल या कारणांमुळे ही बंदी घालण्यात आलेली आहे, अशी माहिती नगराध्यक्षा प्रिया मिशाळ यांनी दिली.

    नवी दिल्ली : गोव्यातील म्हापसा शहरात स्टॉलवर आणि टेबलवर गोबी मंचुरियनवर बंदी घालण्यात आली आहे. गोबी मंचुरियनमध्ये कृत्रिम रंगाचा वापर केला जातो आणि स्टॉलवर पुरेशी स्वच्छता नसेल या कारणांमुळे ही बंदी घालण्यात आलेली आहे, अशी माहिती नगराध्यक्षा प्रिया मिशाळ यांनी दिली.

    ‘विक्रेते गोबी मंचुरियन बनवण्यासाठी कृत्रिम रंगाचा वापर करतात. तसेच स्वच्छतेची काळजी घेतली जात नाही, अशी तक्रार नगरसेवकांनी केली होती. या तक्रारींच्या आधारे शहरात गोबी मंचुरियनच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे, असे नगराध्यक्षा प्रिया मिशाळ म्हणाल्या.

    गोबी मंचुरियन बनवणारे स्टॉलधारक दर्शनी भागात चांगल्या प्रकारच्या सॉसच्या बाटल्या ठेवतात, पण प्रत्यक्षात गोबी मंचुरियन बनवताना मात्र कमी दर्जाचे सॉस वापरले जातात. तसेच गोबीला कुरकुरीतपणा आणण्यासाठीही विशिष्ट प्रकारची पॉवडर वापरली जाते. श्री देव बोडगेश्वर देवस्थान समितीने गेल्या वर्षीही गोबी मंचुरियन स्टॉल्स ना परवानगी देण्यात येणार नसल्याचे जाहीर केले होते. परंतु गोबी मंचुरियनचे स्टॉल थाटण्यात आले होते आणि नगरपालिकेनेही त्यावर कोणतीही कारवाई केली नव्हती.

    यावर्षी पुन्हा देवस्थान समितीने गोबी मंचुरियन स्टॉल्सना परवानगी दिली. नगरपालिका त्यावर जी कारवाई करेल त्यास देवस्थान समितीची कोणतीही हरकत नसल्याचे सांगितले होते. त्याप्रमाणे म्हापसा नगरपालिकेने ठराव घेऊन गोवी मंचुरियन चे स्टॉल्स बंद पडले होते.