सोने खरदी करत आहात, तर आधी भाव घ्या जाणुन! सोन्याने ओलांडला 60,000 चा टप्पा

यासोबतच चांदीही प्रतिकिलो ७०,००० रुपयांच्या (Silver Price) जवळ पोहोचला आहे. सोन्याच्या किमतीने प्रथमच प्रति 10 ग्रॅम ₹60,000 चा अंक ओलांडला.

सध्या भारतात लग्नसराईचे दिवस आहेत. लग्न समारंभ म्हण्टलं की डोळ्यासमोर  येतात ते सोन्याचे दागिने आणि दागिने खरेदी करण्यासाठी दुकानात असलेली ग्राहकांची लांबच लांब रांग. जर तुम्हीही आज सोनं खरेदी करायला जाणार असाल तर आधी सोन्याची नवी विक्रमी (Gold Price Today) किंमत तपासा.

अमेरिका आणि युरोपमधील बँकिंग संकटांमुळे गुंतवणुकदारांच्या खरेदीला परतावा मिळू लागल्याने सोमवारी मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याच्या किमतीत वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. सोमवारच्या व्यापारादरम्यान MCX वर  सोन्याच्या दरात (Gold Price Today) आज मोठी झेप आहे. यासोबतच चांदही प्रतिकिलो ७०,००० रुपयांच्या (Silver Price) जवळ पोहोचला आहे. सोन्याच्या किमतीने प्रथमच प्रति 10 ग्रॅम ₹60,000 चा अंक ओलांडला.

MCX गोल्ड फ्युचर्स ₹897 किंवा 1.51 टक्क्यांनी वाढून काल दुपारी 12:55 वाजता ₹60,280 वर पोहोचले होते. तर, MCX चांदीचे भाव देखील वाढले आणि दुपारी 1:23 वाजता ₹599 किंवा 0.87 टक्क्यांनी वाढून ₹69,100 प्रति किलोवर झाले होते.

मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याचा भाव 1.73 टक्क्यांच्या वाढीसह 60413 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पातळीवर व्यवहार करत आहे. यासोबतच भारतीय सराफा बाजारात सोन्याचा भाव 58220 रुपये प्रति 10 ग्रॅम या पातळीवर बंद झाला.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव वर्षभरात प्रथमच 2,000 डॉलर प्रति औंसच्या वर गेला आहे.