सोन्या-चांदीच्या दरात घट, जाणून घ्या आजचे भाव?

आज सकाळच्या दरम्यान एमसीएक्सवर सोन्याचा वायदा भाव ०.७५ टक्क्यांनी म्हणजे ४१२ रुपयांनी कमी झाला आहे. त्यामुळे दरात प्रती १० ग्रॅम ५४ हजार ७२० रुपयांवर ट्रेंड करत होता. तसेच चांदीच्या भावातही स्थानिक बाजारात काल सोमवारी सकाळी घट दिसून आली आहे. एमसीएक्सवर ४ डिसेंबर २०२० च्या चांदीचा वायदा भाव १.२२ टक्के घटीसह म्हणजे ९५७ रुपयांची घट झाली आहे. तसेच ७७ हजार २९९ रुपये प्रतिकिलो ग्रॅमवर ट्रेंड करत आहे.

नवी दिल्ली :  सोन्या-चांदीच्या दरात आज मंगळवारी घट झाल्याचे पाहायला मिळाले आहे. ५ ऑक्टोबर रोजी २०२० च्या सोन्याचा भाव ०.७५ टक्क्यांनी वधारला होता. परंतु आज सकाळच्या दरम्यान एमसीएक्सवर सोन्याचा वायदा भाव ०.७५ टक्क्यांनी म्हणजे ४१२ रुपयांनी कमी झाला आहे. त्यामुळे दरात प्रती १० ग्रॅम ५४ हजार ७२० रुपयांवर ट्रेंड करत होता. तसेच चांदीच्या भावातही स्थानिक बाजारात काल सोमवारी सकाळी घट दिसून आली आहे. एमसीएक्सवर ४ डिसेंबर २०२० च्या चांदीचा वायदा भाव १.२२ टक्के घटीसह म्हणजे ९५७ रुपयांची घट झाली आहे. तसेच ७७ हजार २९९ रुपये प्रतिकिलो ग्रॅमवर ट्रेंड करत आहे.   

मुंबईत सोने आणि चांदीच्या दरात कमालीची तेजी झाल्याची पाहायला मिळत आहे. सोमवारी वायदा बाजार चादींचे भाव ९६० रूपयांनी वाढले. तर चांदी ७५ हजार १२० रूपये प्रति किलोग्रॅमवर पोहोचली होती, तसेच सोन्याचे दर वाढले असून प्रति ग्रॅमसाठी ७० ते ७५ हजार रूपयेवर पोहोचण्याचा अंदाज होता.

मात्र आज मंगळवारी सोने प्रति ग्रॅम १० ग्रॅम १० रुपयांनी महागले आहे. त्यामुळे प्रति १० ग्रॅमसाठी २४ कॅरेट सोन्याचा आजचा दर ५५ हजारवर ३८० आणि प्रति १० ग्रॅमसाठी २२ कॅरेट सोन्याचा आजचा दर ५४ हजारवर ३८० असा सुरू आहे. त्याचप्रमाणे सोन्याच्या दरासोबत चांदीच्या दरातही किरकोळ वाढ झाल्याचे दिसून आले.