खूशखबर! २०२२ मध्ये होणार बंपर पगारवाढ; उद्योग जगतात आनंदाचे वातावरण

डेलॉयट टच तोहमत्सु इंडिया एलएलपीचे पार्टनर आनंदोरूप घोष यांच्या मतानुसार अधिकाधिक कंपन्या २०२१ च्या तुलनेत २०२२ मध्ये चांगली पगारवाढ देण्याच्या मूडमध्ये आहेत. कोरोनामुळे अनिश्चितता असतानाही या कंपन्या काम करत आहेत. कंपन्यांनाही यंदाचा व्यवसाय किती होईल याचा अंदाज नाहीय.

    भारतीय उद्योग जगतात सध्या आनंदाचे वारे वाहत आहे. त्याला कारणही तसेच आहे.आगामी ३-४ महिन्यात म्हणजे पुढील वर्षी २०२२ मध्ये सरासरी ८.६ टक्के पगारवाढ मिळण्याचे संकेत आहेत . डेलॉयट या कंपनीच्या एका सर्व्हेमध्ये ही बाब समोर आली आहे. भारतीय कार्पोरेटने २०२१ मध्ये आपल्या कर्मचाऱ्यांना सरासरी ८ टक्के पगारवाढ दिली आहे. यामुळे पुढील वर्षी ही वाढणारी पगारवाढ चांगल्या अर्थव्यवस्था आणि बाजारपेठेतील सुधारणा याचे संकेत मानले जात आहे.

    कंपन्यांचा सर्व्हे तयार

    डेलॉयटच्या सर्व्हेमध्ये २०२१ च्या सेकंड फेजनुसार ९२ टक्के कंपन्यांनी यंदा आठ टक्के पगारवाढ दिली. सर्व्हेमध्ये सहभागी झालेल्या जवळपास २५ टक्के कंपन्यांनी पुढील वर्षी दुहेरी अंकात पगारवाढ देण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.हा सर्व्हे जुलै २०२१पासून सुरु करण्यात आला. सुरुवातीला मोठमोठ्या कंपन्यांचे अनुभवी एचआरची मते नोंदविण्यात आली. यामध्ये ४५०हून अधिक कंपन्यांचा सहभाग होता. कर्मचाऱ्याचे कौशल्य आणि कामगिरी यावरून या कंपन्या पगारवाढ देणार आहेत.

    डेलॉयट टच तोहमत्सु इंडिया एलएलपीचे पार्टनर आनंदोरूप घोष यांच्या मतानुसार अधिकाधिक कंपन्या २०२१ च्या तुलनेत २०२२ मध्ये चांगली पगारवाढ देण्याच्या मूडमध्ये आहेत. कोरोनामुळे अनिश्चितता असतानाही या कंपन्या काम करत आहेत. कंपन्यांनाही यंदाचा व्यवसाय किती होईल याचा अंदाज नाहीय. तरीही काहींनी सकारात्मकता दाखविली आहे.