गुड नाईट पार्टी, कॉकटेल अन् मृत्यू… दिशा सालियनच्या फ्लॅटमध्ये ‘त्या’ रात्री काय घडलं, CBI चा अहवाल काय होता?

दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूतची माजी मॅनेजर दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणाने महाराष्ट्राच्या राजकारणाचा पारा वाढवला आहे. या प्रकरणात भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणेंपासून अनेकांनी गंभीर आरोप केले. राणेंनी या प्रकरणात शिवसेना नेते आदित्य ठाकरेंवरही गंभीर आरोप केले. मात्र, आता या प्रकरणी हिवाळी अधिवेशनात राजकीय वातावरण चांगलचं तापतलं आहे. 

  दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूतची माजी मॅनेजर दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणाने महाराष्ट्राच्या राजकारणाचा पारा वाढवला आहे. या प्रकरणात भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणेंपासून अनेकांनी गंभीर आरोप केले. राणेंनी या प्रकरणात शिवसेना नेते आदित्य ठाकरेंवरही गंभीर आरोप केले. मात्र, आता या प्रकरणी हिवाळी अधिवेशनात राजकीय वातावरण चांगलचं तापतलं आहे.

  दरम्यान या प्रकरणाचा तपास मुंबई पोलीस आणि सीबीआयच्या पथकानं केला होता. हीच टीम सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाची चौकशी करत होती. त्या वेळी सीबीआयने दिशाच्या प्रकरणात दिलेली थिअरीही संबंधितांनी मान्य केली होती. आता एसआयटी या प्रकरणाचा तपास करणार आहे. एसआयटी कोणत्या मुद्द्यांच्या आधारावर या प्रकरणाचा तपास करणार आहे, याबाबत अनेकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे.

  28 वर्षांची दिशा सालियान ही अभिनेता सुशांतसिंह राजपूतची माजी व्यवस्थापक होती. आठ आणि नऊ जून 2020 च्या मध्यरात्री दोन वाजता इमारतीच्या 14 व्या मजल्यावरून पडून दिशाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर पाचच दिवसांनी म्हणजे 14 जून 2020 रोजी, सुशांतसिंह राजपूत त्याच्या घरात मृतावस्थेत आढळला होता. या दोन्ही प्रकरणांचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला होता.

  सीबीआयने काय सांगितलं होतं?

  दिशाची हत्या झाली नसल्याचा दावा सीबीआयच्या टीमने केला होता. सीबीआयच्या म्हणण्यानुसार, दिशा तिच्या सोसायटीमध्ये 14 व्या मजल्यावर राहत होती. ज्या रात्री घटना घडली होती तेव्हा ती दारूच्या नशेत होती. त्यामुळे ती तोल जाऊन फ्लॅटमधून खाली पडली. 8-9 जून 2020 च्या रात्री दिशाने तिच्या फ्लॅटमध्ये वाढदिवसाची पार्टी आयोजित केली होती. तिचे अनेक मित्रही तिथे उपस्थित होते. दिशा तिचा बॉयफ्रेंड आणि मित्रांसोबत भरपूर दारू प्यायली होती. त्यानंतर सर्व जण जेवले. पार्टी संपल्यानंतर ती घराच्या बाल्कनीत उभी होती. अचानक तिचा तोल गेला आणि ती खाली पडली. डोक्याला आणि शरीराला गंभीर दुखापत झाल्याने व जास्त रक्तस्राव झाल्याने दिशाचा मृत्यू झाला होता. सीबीआयने या तपासासाठी वेगळा गुन्हा नोंदवला नव्हता.

  दिशा सालियनशी कोणताही गैरप्रकार झाला नव्हता. शारीरिक हल्ल्याचे कोणतेही पुरावे आढळले नव्हते. ती उंचावरून खाली पडली होती. त्यामुळे प्रायव्हेट पार्टला दुखापत होण्याचा प्रश्नच नव्हता, असं तपासात सांगण्यात आलं होतं. त्या वेळी दिशाच्या मृत्यूबाबत सोशल मीडियावर अनेक अंदाज लावले जात होते. दिशा आणि सुशांतच्या मृत्यूचा थेट संबंध जोडला जात होता.

  वडिलांनी केली होती पोलीस तक्रार

  दिशाचे वडील सतीश सालियन यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटलं होतं, की मीडियातल्या काही व्यक्ती त्यांच्या मुलीची बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहेत. तिच्या मृत्यूबाबत आक्षेपार्ह पोस्ट शेअर करत आहेत. नेत्यांसोबत ती पार्टी करत असल्याच्या बातम्या एकदम खोट्या आहेत. तिच्याबद्दल बलात्कार, खून अशा शब्दांचा वापर केला जात आहे. यामुळे दिशा आणि कुटुंबाची बदनाम होत आहे.