३० जूनला सुरू होणाऱ्या अमरनाथ यात्रेसाठी प्रशासन सज्ज

    कोरोना(Corona)मुळे दोन वर्षे बंद राहिलेली अमरनाथ यात्रा (Amarnath Yatra) ३० जूनला सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी सुरक्षा व्यवस्था करण्यात आल्याचे अनंतनाग(Anantnag)चे उपविभागीय आयुक्त डॉ. पियूष सिंगला यांनी सांगितले. या वर्षी ३० जूनपासून जम्मू-काश्मीर (Jammu-Kashmir) येथील अमरनाथ यात्रा सुरू होणार आहे. ही यात्रा यंदा ४३ दिवस चालणार आहे. त्यानंतर रक्षाबंधन(Rakshabandhan)च्या दिवशी ही यात्रा बंद होणार आहे.

    नुकत्याच झालेल्या अमरनाथ श्राईन बोर्डाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. अमरनाथ यात्रा ही ही हिंदू (Hindu) धर्मातील सर्वात कठीण यात्रा समजली जाते. या यात्रेचा प्रवास अतिशय कठीण आहे. या यात्रेसाठी भाविकांनी आही नोंदणी करावी लागते. त्यानंतर भाविकांची वैद्यकीय चाचणी केली जाते. कारण ही यात्रा पूर्ण करण्यासाठी दुर्गम डोंगरातून जावे लागते. बाबा बर्फानीचे दर्शन मिळणे भाग्याचे समजले जाते. आषाढ पौर्णिमेला सुरू होणारी ही यात्रा श्रावणापर्यंत चालते. दरवर्षी ७ लाख लोक ही यात्रा करतात.