आता एटीएममधून पैशासारखे गहू बाहेर येणार; लखनऊत धान्याचं एटीएम सुरु, आता रांगेत उभं राहायचं टेन्शन नाही!

पूर्वी तांदूळ, गहू आदी वस्तू ग्राहकांना तराजूने मोजुन दिल्या जात होत्या, तेथे आता ग्राहकांना रेशन वाटपाचे काम धान्य एटीएमद्वारे केले जाणार आहे.

उत्तर प्रदेश (उत्तर प्रदेश) मधून एक अनोखी बातमी समोर येत आहे. राजधानी लखनऊच्या (Lucknow ) पहिल्या आणि अनोख्या ग्रेन एटीएमचं (Grain ATM) बुधवारी येथे उद्घाटन करण्यात आले. तेथे अन्न आणि रसद राज्यमंत्री सतीश शर्मा यांनी रिबन कापून या एटीएमचे उद्घाटन केले. हसनगंज फूड एरियातील रास्त भाव विक्रेते पंकज गिरी यांच्या दुकानात हे एटीएम बसवण्यात आले आहे. आता हे  एटीएम काम कसं करतं हे ही जाणून घ्या.

आता एटीएममधुन निघणार धान्य

याबाबत अधिक माहिती देताना राज्यमंत्री सतीश शर्मा म्हणाले की, उत्तर प्रदेशात तीन ठिकाणी हे एटीएम बसवण्यात आले आहे. लखनऊमध्ये अशा प्रकारचे हे पहिले एटीएम आहे. येथे 12 लाख रुपये खर्चून बसविण्यात आले आहे.

पूर्वी तांदूळ, गहू आदी वस्तू ग्राहकांना तराजूने मोजुन दिल्या जात होत्या, तेथे आता ग्राहकांना रेशन वाटपाचे काम धान्य एटीएमद्वारे केले जाणार आहे. त्याचवेळी एका ग्राहकाने सांगितले की, “जे रेशन आधी कमी दिले जात होते, त्याचीही तक्रार नाही.”

विशेष म्हणजे,  या ग्रेन एटीएममध्ये, लाभार्थ्याला त्याचा अंगठा Konnect POS मशीनमध्ये टाकून त्याचे बायोमेट्रिक स्कॅन करावे लागेल. यानंतर, एटीएममधून निश्चित केलेल्या युनिटनुसार, गहू आणि तांदूळ फक्त दोन मिनिटांत आउटलेटमध्ये पोत्यात सोडले जातील. अशा परिस्थितीत आता लोकांना तासन् तास रांगेत उभे राहावे लागणार नाही.