Graphics Story : नरेंद्र मोदींच्या आयुष्यातील भन्नाट किस्से

नरेंद्र मोदींच्या ज्या शाळेत शिकत होते त्या शाळेभोवती भिंत उभारायची होती. मात्र, त्यावेळी शाळेकडे पैसे नव्हते. तेव्हा नरेंद्र यांनी पुढाकार घेत एक नाटक बसवले. या नाटकाच्या प्रयोगातून आलेले पैसे नरेंद्र मोदी यांनी शाळेला भिंत बांधण्यासाठी दिले होते.

  नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ७१ वा वाढदिवस साजरा करत आहेत. १७ सप्टेंबर १९५० रोजी गुजरातमध्ये त्यांचा जन्म झाला होता. बालपणी त्यांच्या घरातील आर्थिक परिस्थिती हालाखीची होती. मात्र, या खडतर परिस्थितीशीवर मात करत त्यांनी जीवनाच्या विविध टप्प्यावर यश मिळावीत पंतप्रधानपदापर्यंत झेप घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वैयक्तिक जीवन अनेक रंजक गोष्टींनी भरलेले आहे. अशाच काही रंजक गोष्टीं ग्राफिक्सच्या माध्यमातून देत मोदींना शुभेच्छा देण्याचा हा प्रयत्न

  गुजरातच्या वडनगरमध्ये जन्मलेल्या नरेंद्रला लहानपणापासूनच ऋषीमुनींचे जीवन आणि संन्यासाविषी आकर्षण होते. नरेंद्र मोदी यांचे बालपण ६ भावंडांच्या कुटुंबात गेले. त्यांचे लहानपण हलाखीत जीवन गेले.

  नरेंद्र मोदी यांचे शालेय शिक्षण गुजरात येथील वडनगरमध्ये झाले. ते लहानपणापासूनच वक्तृत्व कलेत निपुण होते. वयाच्या १७ व्या वर्षी त्यांनी घर सोडले आणि त्यांच्या आध्यात्मिक प्रवासाला निघाले.

  नरेंद्र मोदींचा लहापणीचा एक किस्सा खूप गाजला आहे. नरेंद्र मोदी एकदा बालपणीच्या मित्रासोबत शर्मिष्ठा सरोवरावर गेले होते.

  नरेंद्र मोदी लहानपणीही खोडकर होते. खोडकरपणातूनही लहान मुलांचा विकास होतो, असे त्यांनी सांगितले होते.

  नरेंद्र मोदींना लहानपणापासूनच प्राणी आणि पक्ष्यांविषयी प्रेम आहे. किशोर मकवाना यांनी ‘कॉमन मॅन नरेंद्र मोदी’ मध्ये एक किस्सा लिहिला आहे.

  नरेंद्र मोदींच्या ज्या शाळेत शिकत होते त्या शाळेभोवती भिंत उभारायची होती. मात्र, त्यावेळी शाळेकडे पैसे नव्हते. तेव्हा नरेंद्र यांनी पुढाकार घेत एक नाटक बसवले.

  नरेंद्र मोदींच्या घराची आर्थिक स्थिती चांगली नव्हती. कुटुंबाला शूज खरेदी करणे शक्य नव्हते. एकदा काकांनी त्याला पांढरे कॅनव्हासचे शूज विकत घेतले.