gst collection increase by 10 percent

फेब्रुवारीच्या आकडेवारीनुसार, दर दिवशी सरासरी ४०३५ कोटींची वसुली झाल्याचे निदर्शनास येते. जेव्हाकि हा महिना केवळ २८ दिवसांचा असतो. या आधारावर जर आपण ३१ दिवसांचा महिना गृहित धरला तर मार्च महिन्यात ही आकडेवारी १.२५ लाख कोटींवर पोहोचते. तथापि यापेक्षा जास्त वसुली होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

  दिल्ली : वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) वसुली या महिन्यात नवा विक्रम नोंदविण्याची शक्यता आहे. यंदा १.२५ ते १.३० लाख कोटी जीएसटी वसुली होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे आर्थिक वर्षाचा मार्च हा अंतिम महिना असल्याने ही शक्यता व्यक्त केली जात आहे. जुलै २०१७ मध्ये जीएसटी लागू झाल्यानंतर वर्षभरातच ७.४० लाख कोटींची वसुली झाली होती. एप्रिल २०१८ ते मार्च २०१९ दरम्यान ही वसुली ११.७७ लाख कोटी रुपये होती. एप्रिल २०१९ ते मार्च २०२० दरम्यान १२.२२ लाख कोटी तर एप्रिल २०२० ते फेब्रुवारी २०२१ दरम्यान १०.२२ लाख कोटींची वसुली झाली होती.

  चोरीला लगाम

  गेल्या पाच महिन्यांपासून जीएसटी वसुली 1 लाख कोटींपेक्षा अधिक होत आहे. सर्वाधिक वसुली जानेवारी २०२१मध्ये झाली होती. गेल्या सहा महिन्यात कोरोना कालावधीत जीएसटी पथकाने आणि अर्थ मंत्रालयाने मोठ्या प्रमाणात जीएसटी चोरी रोखली होती. त्यामुळेच जीएसटी कलेक्शन मोठ्या प्रमाणात झाल्याचे जाणकार सांगतात.

  सहा महिन्यात छापे

  गेल्या सहा महिन्यात देशभरात छापे मारण्यात आले होते. बनावट कंपन्या आणि बिलांची फेरफारही उघड झाली होती. या कंपन्या बनावट इनपुटद्वारे क्रेडिट घेत हगोत्या. यासोबतच जीएसटी पथकाने अशा प्रकारचे घोटाळे रोखण्यासाठी आयटी सिस्टमही मजबूत केले आहे. याशिवाय पथकाचे सदस्य प्रत्येक राज्यात मोठ्या कंपन्यांच्या व्यवहारावरही देखरेख करीत आहेत.

  फेब्रुवारीत प्रत्येक दिवशी ४०३५ कोटींचे कलेक्शन