
परीक्षेच्या १३ दिवस आधी म्हणजेच १६ जानेवारीला हैदराबादेतील प्रिंटिंग प्रेसमधून पेपर फुटल्याचे चौकशीत समोर आले आहे. हा पेपर सर्वात आधी प्रेसमध्ये काम करणाऱ्या कामगाराच्या हाती लागला. त्याने तो ७० हजारात विकला. त्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये १२ ते १५ लाख रुपयांपर्यंत याची विक्री झाली.
नवी दिल्ली – गुजरातमध्ये रविवारी होणाऱ्या गुजरात पंचायत सेवा निवड मंडळाच्या कनिष्ठ लिपिक स्पर्धा परीक्षेचा पेपर फुटल्याने ही परीक्षा रद्द करण्यात आली. हे २०१४ नंतरचे १४ वे पेपरफुटी प्रकरण आहे. या प्रकरणी गुजरात एटीएसने ऑनलाइन परीक्षा घेणाऱ्या कंपनीच्या एमडीसह १६ जणांना अटक करण्यात आली आहे.
हैदराबादेतील प्रिंटिंग प्रेसमधून पेपर फुटल्याचे चौकशीत समोर
परीक्षेच्या १३ दिवस आधी म्हणजेच १६ जानेवारीला हैदराबादेतील प्रिंटिंग प्रेसमधून पेपर फुटल्याचे चौकशीत समोर आले आहे. हा पेपर सर्वात आधी प्रेसमध्ये काम करणाऱ्या कामगाराच्या हाती लागला. त्याने तो ७० हजारात विकला. त्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये १२ ते १५ लाख रुपयांपर्यंत याची विक्री झाली. या घोटाळ्याचे तार बिहार, ओडिशासोबतही जुळले आहेत. गुजरात दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) बडोद्यात ‘पाथवे एज्युकेशन सर्व्हिस’चे एमडी आणि ‘स्टेकवाइज टेक्नोलॉजी’ नावाचे खासगी परीक्षा केंद्र व क्लास चालवणाऱ्या भास्कर चौधरीसह १६ आरोपींना अटक आल्याचे पोलिसांनी सांगितले.