Tejasvi-Yadav-(RJD-Leader)

बिहारमध्ये दररोज शेकडो हत्या, लूटमार, अपहरण आणि बलात्काराच्या घटना, हेच भाजप नेतृत्वाताली सरकारच्या मुख्य उपलब्धी आहेत. गुन्हेगारीवर वचक बसविण्यात अपयशी ठरलेल्या गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी तेजस्वी यादव यांनी केली आहे

पाटणा. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार सुशासनाचे दावे करतात. नितीशकुमार गुन्हे आणि गुन्हेगारांवर वचक बसविण्याच्या बाता करतात, मात्र बिहारमध्ये गुंडगिरीने कळस गाठला आहे. बिहार राज्य गुन्हेगारी रेकॉर्ड ब्युरोच्या आकडेवारीवरून हे सिद्ध झाले आहे. ब्युरोच्या आकडेवारीनुसार, राज्यात यावर्षी जानेवारी ते सप्टेंबरदरम्यान २४०६ जणांची हत्या झाली असून बलात्काराचे ११०६ प्रकरणे दाखल करण्यात आली आहे. यावरून विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढविला आहे. तेजस्वी यादव यांनी ट्विट करून राज्याच्या गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे.

बिहारमध्ये दररोज शेकडो हत्या, लूटमार, अपहरण आणि बलात्काराच्या घटना, हेच भाजप नेतृत्वाताली सरकारच्या मुख्य उपलब्धी आहेत. गुन्हेगारीवर वचक बसविण्यात अपयशी ठरलेल्या गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी तेजस्वी यादव यांनी केली आहे. दुसरीकडे, पोलिसांच्या मते, राज्यात हत्येची जी प्रकरणे समोर येत आहे, त्यापैकी बऱ्याच घटनांमागे जमीन वाद किंवा आपसातील वाद हे मुख्य कारण आहे.