भारताच्या हातून वर्ल्ड कप निसटला, ‘या’ कंपनीने कर्मचाऱ्यांना दिली एक दिवसाची सुट्टी, म्हणाले- पराभवाचा धक्का विसरण्यास मदत होईल!

विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताच्या पराभवानंतर गुरुग्रामच्या एका कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना एक दिवसाची सुट्टी दिली. कर्मचाऱ्यांना पराभवाचा धक्का विसरायला मदत होईल. असं कंपनीने स्पष्टीकरण दिलं.

    भारतीय क्रिकेट संघाला २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या (world cup final match) अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवाने कोट्यवधी भारतीय निराश झाले. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, मोहम्मद सिराजसह अनेक क्रिकेटपटूंना आपल्या भावना लपवता आल्या नाही. संपूर्ण देशासाठी हा मोठा धक्का होता. हा धक्का पचवनं अजूनही अनेकांना शक्य होत नाही आहे. अशातच आता एक वेगळी बातमी येत आहे. भारताच्या पराभवानंतर गुरुग्रामस्थित कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना एक दिवसाची सुट्टी दिली होती. वर्ल्डकमप न मिळाल्याचा धक्का या सुट्टीमुळे विसरण्यास मदत होईल, असं कर्मचाऱ्यांना सांगण्यात आलं, आणि दुसऱ्या दिवशी त्याच ताकदीने कामावर या असा मेसेज देण्यात आला.  कंपनीच्या एका कर्मचाऱ्याने सोशल मीडियावर ही माहिती दिली. ही पोस्ट इंटरनेटवर चांगलीच व्हायरल होत आहे. यावर लोकांच्या प्रतिक्रियाही उमटल्या आहेत.

    गुरुग्राममधील मार्केटिंग मूव्हज एजन्सीमधील कर्मचारी दीक्षा गुप्ता हिने विश्वचषक २०२३ च्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या ६ विकेटने विजय मिळवल्यानंतर लिंक्डइनवर एक पोस्ट शेअर केली. वर्ल्ड कपमधील भारताचा प्रत्येक विजय सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर त्याने टीमचा पराभवाबद्दल पोस्ट केली. मात्र, या धक्क्याला तोंड देण्यासाठी कंपनीने कर्मचाऱ्यांना एक दिवसाची सुट्टी दिल्याची माहितीही त्यांनी शेअर केली.

    तिने तिच्या पोस्टमध्ये लिहिले आहे, “आज सकाळी, मला माझ्या बॉसच्या संदेशाने जाग आली ज्यामध्ये भारताच्या हृदयद्रावक पराभवामुळे झालेल्या मानसिक नुकसानामुळे सर्वांना एक दिवस सुट्टी घेण्यास सांगितले. हे आश्चर्यकारक होते. “आमच्यापैकी कोणीही यावर विश्वास ठेवला नाही. अधिकृत ईमेल आला.”

    त्याने त्याच्या बॉस चिराग अलावधीने पाठवलेल्या संदेशांचे स्क्रीनशॉट देखील शेअर केले. त्यात लिहिले होते, “नमस्कार संघ! विश्वचषकातील भारताचा पराभव पाहता, त्याचा आमच्या संघातील सदस्यांवर झालेला मानसिक परिणाम आम्हाला समजतो. या काळात कर्मचाऱ्यांना मदत करण्यासाठी कंपनीने एक दिवसाची सुट्टी माफ करण्याचा निर्णय घेतला आहे.” विश्वास आहे की यामुळे प्रत्येकाला पराभवाचा धक्का बसण्यास मदत होईल आणि नंतर दुसऱ्या दिवशी संघटितपणे कामावर परत यावे.” सोमवारी (२० नोव्हेंबर) सुट्टी असल्याने या पोस्टची नंतर ईमेलमध्ये पुष्टी करण्यात आली.