ज्ञानवापी मशीद वाद प्रकरणी वाराणसी कोर्ट आज सुनावणार निकाल

तसेच पुढील सुनावणी कशी होणार, याची रूपरेषा काय असेल, हेसुद्धा आज सांगण्यात येणार आहे. तसंच याबाबतच्या अन्य पुरवणी याचिकांवरही विचार करण्याचे न्यायालयाने ठरवले आहे. 

    ज्ञानवापी मशीद वाद प्रकरणाची जिल्हा न्यायालयात सुनावणी पूर्ण झाली असून न्यायालय मंगळवारी दुपारी 2 वाजता निकाल सुनावणार आहे. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकल्यानंतर कोर्टाने आपला निकाल सुरक्षित ठेवला असून आज निकाल सुनावणार आहे.

    सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर ज्ञानवापी मशीद वादाची सुनावणी वाराणसी जिल्हा कोर्टासमोर झाली. ज्ञानवापी मशीद प्रकरणातील पुढील सुनावणीची प्रक्रिया काय असावी याबाबत कोर्ट आज निकाल सुनावणार आहे. सुनावणी दरम्यान याचिकाकर्त्या हिंदू पक्षाने सर्वेक्षणात समोर आलेले साक्षी पुरावे कोर्टाने पाहावेत. त्यानंतर त्यापुढील सुनावणी करावी अशी मागणी केली. तर, मुस्लिम पक्षाने खटल्याच्या वैधतेवर सुनावणीची मागणी केली होती. तसेच पुढील सुनावणी कशी होणार, याची रूपरेषा काय असेल, हेसुद्धा आज सांगण्यात येणार आहे. तसंच याबाबतच्या अन्य पुरवणी याचिकांवरही विचार करण्याचे न्यायालयाने ठरवले आहे.