Gyanvapi's four basements were unlocked and inspected 50% survey completed in Kadekot settlement

ज्ञानवापी मशिद आहे की मंदिर? याचा वाद चांगलाच पेटला आहे. ज्ञानवापीच्या चार तळघरांचे कुलूप उघडून तपास करण्यात आला. कडेकोट बंदोबस्तात 50% सर्वेक्षण पूर्ण झाले आहे(Gyanvapi's four basements were unlocked and inspected; 50% survey completed in Kadekot settlement ).

  वाराणसी : ज्ञानवापी मशिद आहे की मंदिर? याचा वाद चांगलाच पेटला आहे. ज्ञानवापीच्या चार तळघरांचे कुलूप उघडून तपास करण्यात आला. कडेकोट बंदोबस्तात 50% सर्वेक्षण पूर्ण झाले आहे(Gyanvapi’s four basements were unlocked ).

  ज्ञानवापी कॅम्पसमध्ये शनिवारी पहिल्या दिवसाचे सर्वेक्षण पूर्ण झाले. हे सर्वेक्षण शनिवारी 4 तास चालले. या दरम्यान, सुमारे 50% सर्वेक्षण झाले. अधिवक्ता आयुक्त अजय मिश्रा यांच्यासह फिर्यादी व प्रतिवादी यांच्या 52 जणांच्या पथकाने आवारातील 4 तळघरांचे कुलूप उघडून तपास केला. पथकाने भिंती आणि खांबांची व्हिडिओग्राफीही केली.

  रविवारी सकाळी आठ वाजल्यापासून पुन्हा सर्वेक्षणाचे काम केले जाणार आहे. यावेळी वरच्या मजल्यावरील खोल्यांचे सर्वेक्षण केले जाईल. सर्वेक्षणासाठी गेलेल्या संपूर्ण पथकाचे मोबाईल बाहेर जमा करण्यात आले होते. सर्वेक्षणाशी संबंधित कोणतीही माहिती बाहेर येऊ नये, अशा सक्त सूचना पथकाला देण्यात आल्या आहेत.

  500 मीटरपर्यंत ‘नो एंट्री’

  न्यायालयाच्या कडक आदेशाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता. ज्ञानवापी परिसराच्या 500 मीटर अंतरावर सार्वजनिक आणि माध्यमांना प्रवेश बंद करण्यात आला होता. सर्व दुकानेही बंद होती. आजूबाजूच्या घरांच्या छतावर पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. एक किलोमीटरच्या परिघात 1500 हून अधिक पोलिस-पीएसी कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. स्वत: डीएम कौशलराज शर्मा आणि पोलिस आयुक्त ए. सतीश गणेश संपूर्ण पाहणीदरम्यान घटनास्थळी उपस्थित होते.

  अहवाल गोपनीय ठेवण्याचे निर्देश

  सर्वेक्षणादरम्यान उपस्थित वकिलांनी रविवारीही सर्वेक्षण होणार असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. तथापि भिंतीवरील भित्तीचित्रे, प्रतीक चिन्हे, तळघरात काय सापडले, या प्रश्नांची उत्तरे देण्याचे वादी पक्षकार जितेंद्रसिंह बिसेन यांच्यासह प्रत्येक वकिलाने टाळले. विशेष म्हणजे कोर्टानेच सर्वेक्षणाचा अहवाल गोपनीय ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. तथापि, बिसेन यांनी ‘अकल्पीत’ असे आढळले असल्याचे मोघम उत्तर दिले.

  काय आहे ज्ञानवापी मशीदचा वाद

  औरंगजेबाने काशी विश्वनाथ मंदिर पाडून ज्ञानवापी मशीद बांधली असा दावा केला जात आहे. हा मंदिर-मशीद वाद वर्षानुवर्षे जुना असून त्यावरून दंगलीही झाल्या होत्या. स्वातंत्र्यानंतर या मुद्द्यावरून दंगल झाली नाही. ( Gyanvapi Masjid ) अयोध्येत राम मंदिराचा मुद्दा तापल्यानंतर (1991) मध्ये ज्ञानवापी हटवून त्याची जमीन काशी विश्वनाथ मंदिराला द्यावी यासाठी दाखल करण्यात आलेली पहिली याचिका दाखल करण्यात आली होती.