फक्त 1500 रुपयांच्या व्याजासाठी दलित महिलेचा छळ; विवस्त्र करून मारहाणही केली

बिहारमध्ये एका दलित महिलेला 1500 रुपयांचे व्याज दिले नाही म्हणून विवस्त्र (Crime in Bihar) करून लाठ्याकाठ्यांनी मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली. या महिलेने व्याज दिले नाही म्हणून तिला नग्न करण्यात आले आणि त्यानंतर मूत्र प्राशन करण्यासाठीही सक्ती करण्यात आली.

    पाटणा : बिहारमध्ये एका दलित महिलेला 1500 रुपयांचे व्याज दिले नाही म्हणून विवस्त्र (Crime in Bihar) करून लाठ्याकाठ्यांनी मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली. या महिलेने व्याज दिले नाही म्हणून तिला नग्न करण्यात आले आणि त्यानंतर मूत्र प्राशन करण्यासाठीही सक्ती करण्यात आली.

    बिहारची राजधानी असलेल्या पाटणा या ठिकाणच्या मोसिमपूर गावात ही घटना रात्री दहाच्या सुमारास घडली आहे. या प्रकरणी पोलिस पुढील तपास करत आहे. पीडित महिला रात्री दहाच्या सुमारास घराच्या बाहेर असलेल्या नळावर पाणी पीत होती. त्यावेळी काही लोक तिथे आले. या महिलेला ‘तुझ्या पतीला आम्ही घेऊन जाऊ’, असे सांगितलं.

    त्यानंतर या महिलेला बेदम मारहाण करण्यात आली. या महिलेने पोलिसांना जी माहिती दिली, त्यानुसार, काही लोक आले, मला खूप मारहाण केली. मारहाण करण्याआधी मला त्यांनी विवस्त्रही केले होते. दरम्यान, पोलिसांनी पीडित महिलेचा जबाब नोंदवला असून, पुढील तपास केला जात आहे.