हरियाणाचे गृहमंत्री पंजाबमधील रस्त्यामुळे त्रस्त; अनिल विज यांचे भगवंत मान यांना पत्र

गृहमंत्री विज पंजाबच्या मोहाली जिल्ह्यातील झिरकपूर रस्त्याने त्रस्त आहेत. रामगड ते डेराबस्सी हा रस्ता चौपदरी करण्याची मागणी त्यांनी मुख्यमंत्री भगवंत मान यांना केली. या मार्गावर कायमच वाहतूकीचा खोळंबा होतो.

    चंदिगड – हरियाणाचे गृहमंत्री अनिल विज (Haryana Home Minister Anil Vij) पंजाबमधील (Punjab) एका रस्त्यामुळे त्रस्त आहेत. त्यांचा त्रास इतका वाढला की, त्यांना पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान (Bhagwant Mann) यांना पत्र लिहिले आहे. तसेच, त्यांनी सीएम भगवंत मान नक्कीच माझी मागणी मान्य करतील, अशी आशा व्यक्त केली आहे.

    गृहमंत्री विज पंजाबच्या मोहाली (Mohali) जिल्ह्यातील झिरकपूर रस्त्याने (Zirakpur Road) त्रस्त आहेत. रामगड ते डेराबस्सी हा रस्ता चौपदरी करण्याची मागणी त्यांनी मुख्यमंत्री भगवंत मान यांना केली. या मार्गावर कायमच वाहतूकीचा खोळंबा होतो.

    विज यांनी पत्रात लिहिले आहे की, डेरा बस्सी ते रामगढ हा रस्ता अतिशय वर्दळीचा आहे. याठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असून रस्त्याची अवस्था अत्यंत वाईट आहे. ज्या लोकांना डेराबस्सी मार्गे चंदीगड किंवा पंचकुलाला जावे लागते. ते रामगडमार्गे या रस्त्याने पंचकुला, चंदीगडला पोहोचतात. या मार्गावर विशेषतः जिरकपूरमध्ये नेहमीच वाहतूक कोंडी असते. हा रस्ता अरुंद व तुटलेला असल्याने येथून ये-जा करणाऱ्या नागरिकांना त्रास होतो.