मुस्लिमांनी अल्पवयीन पत्नीशी लैंगिक संबंध ठेवल्यास POCSO अंतर्गत होणार गुन्हा दाखल

केरळ हायकोर्टाने आपल्या एका महत्त्वाच्या निकालात म्हटले आहे की, मुस्लिम पर्सनल लॉ अंतर्गत मुस्लिमांत झालेला विवाह पॉक्सो कायद्याच्या कक्षेबाहेर नाही. पतीने जर अल्पवयीन पत्नीशी शारीरिक संबंध ठेवले तर त्याच्यावर पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला जाऊ शकतो.

  केरळ : केरळ हायकोर्टाने नुकतचं एक महत्त्वाची निकाल दिला आहे.  ‘मुस्लिम पर्सनल लॉ अंतर्गत अल्पवयीन मुलीचे लग्न वैध असूनही, तो POCSO कायद्यानुसार गुन्हा मानला जाईल.  अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप असलेल्या ३१ वर्षीय मुस्लिम व्यक्तीचा जामीन अर्ज फेटाळताना न्यायालयाने हा निकाल दिला आहे.

  ‘मुस्लिम पर्सनल लॉ’नुसार झालेलं लग्न पॉक्सोच्या कक्षेबाहेर नाही, अल्पवयीन पत्नीशी संबंध गुन्हा

  केरळ हायकोर्टाने आपल्या एका महत्त्वाच्या निकालात म्हटले आहे की, मुस्लिम पर्सनल लॉ अंतर्गत मुस्लिमांत झालेला विवाह पॉक्सो कायद्याच्या कक्षेबाहेर नाही. पतीने जर अल्पवयीन पत्नीशी शारीरिक संबंध ठेवले तर त्याच्यावर पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला जाऊ शकतो.

   उच्च न्यायालयाचा नेमका निर्णय काय

  केरळ उच्च न्यायालयाने पर्सनल लॉ अंतर्गत मुस्लिमांचे लग्न पोक्सो कायद्याच्या कक्षेतून वगळले जाणार नाही असा निर्णय दिला आहे. विवाहातील मुलगी अल्पवयीन असेल तर, विवाहाची वैधता विचारात न घेता पोक्सो कायद्याखालील त्याचावर गुन्हा दाखल होईल. मुस्लिम विवाहाच्या एका प्रकरणात, 18 नोव्हेंबर 2022 रोजी केरळ उच्च न्यायालयाच्या एकल खंडपीठाचे न्यायमूर्ती बेचू कुरियन थॉमस यांनी हा निकाल दिला. यासोबतच अल्पवयीन पत्नीसोबत शारीरिक संबंध ठेवणाऱ्या पतीचा जामीन अर्जही फेटाळण्यात आला.

  काय प्रकरण आहे?

  मार्च 2021 मध्ये 31 वर्षीय खलिदुर रहमानने 16 वर्षीय फरीहा (नाव बदलले आहे) हिचे अपहरण करून लग्न केले. दरम्यान,  फरीहाने गर्भवती असण्याची शक्यता व्यक्त केल्यावर खलिदुर रहमान तिला आरोग्य केंद्रात घेऊन गेला. मुलगी अल्पवयीन असल्याचे पाहून आरोग्य केंद्राच्या डॉक्टरांनी पोलिसांना माहिती दिली, त्यानंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध ५ हून अधिक कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. त्यानंतर हे प्रकरण न्यायालयात पोहोचलं.