नोकरीचे आमीश देऊन 80 हजारांत भोपाळच्या महिलेला विकले राजस्थानला

मजबूत सिंगने महिलेला सांगितले की, आता तिला तिथे काम करावे लागेल. महिलेला त्याचा हेतू समजू शकला नाही. मजबूत सिंग निघून गेल्यानंतर मोर सिंगने महिलेला सांगितले की, मजबूत सिंगने तिला एका वर्षासाठी 80 हजार रुपयांना विकले आहे. तीला घरात राहावे लागेल, आणि वडील आणि मुलाची सेवा करावी लागेल. मोर सिंग आणि किशन सिंग यांनी तिचा लैंगिक छळ सुरूच ठेवला. आरोपीने तिचा मोबाईल हिसकावून घेतल्याचे पीडितेने पोलिसांना सांगितले. दिवसभर तीला खोलीत कोंडून ठेवले होते. मोरसिंग रात्री यायचे तेव्हा कुलूप उघडायचे.

  मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये महिला तस्करीचे प्रकरण समोर आले आहे. कॅटरिंगमध्ये काम करणाऱ्या महिलेला तिच्या सुपरवायझरने काम मिळवून देण्याचे आमिष देत अपहरण केलं. त्यानंतर या महिलेला राजस्थानमध्ये ८० हजार रुपयांना विकले. पीडित महिला २ महिन्यांहून अधिक काळ राजस्थानमध्ये ओलीस होती. तीला विकत घेणारे पिता-पुत्र तिच्याशी गैरवर्तन करायचे. या प्रकरणी पोलिसांनी ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यात एका महिलेचेही नाव आहे. अद्यापपर्यंत आरोपींना अटक झालेली नाही.

  काय आहे नेमकं प्रकरण?

  दैनिक भास्करच्या वृत्तानुसार, जमालपुरा पोलिस स्टेशनचे प्रभारी राधेश्याम रेंजर यांनी सांगितले की, पीडित तरुणी 24 वर्षांची आणि विवाहित आहे. ती पतीपासून वेगळी राहत होती. दीड वर्षापूर्वी तिची केटरिंग सुपरवायझर मजबूत सिंग याच्याशी भेट झाली. त्याने महिलेला केटरिंगचे काम करून देण्याचे आश्वासन दिले. दरम्यान, 1 ऑक्टोबर रोजी कामाच्या बहाण्याने त्याने महिलेला एका वीटभट्टीवर नेले. तो वीटभट्टीवाला त्या तरुणीला त्याच्या गावी घेऊन गेला. महिलेने कामाबद्दल विचारले असता त्याने सांगितलं की, आता राजस्थानमध्येच काम मिळेल. कामाच्या बहाण्याने तो महिलेला राजस्थानातील पिठापुरा झालावाड येथे घेऊन गेला. जिथे, महिलेला मोर सिंग नावाच्या व्यक्तीकडे सोडले.

  रोज रात्री अत्याचार

  मजबूत सिंगने महिलेला सांगितले की, आता तिला तिथे काम करावे लागेल. महिलेला त्याचा हेतू समजू शकला नाही. मजबूत सिंग निघून गेल्यानंतर मोर सिंगने महिलेला सांगितले की, मजबूत सिंगने तिला एका वर्षासाठी 80 हजार रुपयांना विकले आहे. तीला घरात राहावे लागेल, आणि वडील आणि मुलाची सेवा करावी लागेल. मोर सिंग आणि किशन सिंग यांनी तिचा लैंगिक छळ सुरूच ठेवला. आरोपीने तिचा मोबाईल हिसकावून घेतल्याचे पीडितेने पोलिसांना सांगितले. दिवसभर तीला खोलीत कोंडून ठेवले होते. मोरसिंग रात्री यायचे तेव्हा कुलूप उघडायचे.

  अशी झाली सुटका

  या संपूर्ण प्रकरणाची माहिती पीडितेच्या बहिणीने पोलिसांना दिली. कसा तरी पीडितेने मोर सिंगच्या मोबाईलवरून तिच्या बहिणीला फोन करून सर्व प्रकार सांगितला. बहिणीने पोलीस ठाणे गाठून पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिस राजस्थानला रवाना झाले, जिथे राजस्थानच्या स्थानिक पोलिसांसह पीडितेची सुटका करण्यात आली. पोलीस घटनास्थळी पोहोचले असता ती महिला बंद खोलीत कैद झालेली आढळून आली.