मुलाच्या वाढदिवसाचे सामान आणण्यासाठी गेला तो परतलाच नाही, SUV च्या धडकेत दुचाकीस्वार ठार

पालीच्या बर येथील भेराराम बागडी (४६) रविवारी सायंकाळी दुचाकीने आपल्या घरी जात होते. त्यांच्या मुलाचा वाढदिवस होता. घरी पार्टीसाठी जवळपास २०० पाहुणे जमले होते. भेराराम काही सामान आणण्यासाठी बाजारला गेले होते. तेथून ते घरी परत येत होते. तेव्हा बर-बनाड हायवेवर SUV ने त्यांना धडक दिली.

    नवी दिल्ली – राजस्थानातील पालीच्या बर-बनाड हायवेवर एका भरधाव SUV ने दुचाकीस्वाराला उडवले. हा अपघात एवढा भीषण होता की, शेतकरी दुचाकीसह घसरत ५० फूट दूर जाऊन पडला. त्याला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. रविवारी सायंकाळी ही दुर्घटना घडली. त्याचे CCTV फुटेज सोमवारी उजेडात आले.

    पालीच्या बर येथील भेराराम बागडी (४६) रविवारी सायंकाळी दुचाकीने आपल्या घरी जात होते. त्यांच्या मुलाचा वाढदिवस होता. घरी पार्टीसाठी जवळपास २०० पाहुणे जमले होते. भेराराम काही सामान आणण्यासाठी बाजारला गेले होते. तेथून ते घरी परत येत होते. तेव्हा बर-बनाड हायवेवर SUV ने त्यांना धडक दिली.

    हा अपघात एवढा भीषण होता की, शेतकरी दुचाकीसह ५० फूट घसरत गेला. तर त्याची दुचाकी दुसऱ्या बाजूने येणाऱ्या ट्रॉलीखाली गेली. यावेळी धडक देणाऱ्या एसयूव्हीच्या ड्रायव्हरचेही गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे कार थेट डिव्हायडरवर चढली. त्यानंतर तो गाडी घटनास्थळी सोडून पळून गेला. पोलिसांनी CCTV फुटेजच्या आधारावर तपास सुरू केला आहे.