लग्नसमारंभ झाल्यानंतर सुरेश मेहुणा बृजेशसोबत बाहेर गेला होता. येताना दारु पिऊन घरी आला आणि दारुच्या नशेत बायकोला घरी घेऊन जाण्याचा हट्ट करु लागला. दारुच्या नशेत असलेल्या सुरेशला बायकोने घरी येण्यास नकार दिला.

    लखनऊ : उत्तरप्रदेशात एक भयंकर घटना घडली आहे. मेहुणीच्या लग्नासाठी सासरी गेलेल्या जावयावर मेहुण्याने पेट्रोल टाकून जाळल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. या घटनेत जावई गंभीररित्या होरपळला असून त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

    हमीरपूर जिल्ह्यातील पौथिया गावातील गुरुप्रसाद यांच्या लहान मुलीचे ६ जूनला लग्न होते. लग्नासाठी सवरापूर येथे राहणारा मोठा जावई सुरेश आणि मुलगी शिवकांती तीन मुलांना घेऊन माहेरी आले होते. लग्नसमारंभ झाल्यानंतर सुरेश मेहुणा बृजेशसोबत बाहेर गेला होता. येताना दारु पिऊन घरी आला आणि दारुच्या नशेत बायकोला घरी घेऊन जाण्याचा हट्ट करु लागला. दारुच्या नशेत असलेल्या सुरेशला बायकोने घरी येण्यास नकार दिला. त्यामुळे त्यांच्यात भांडण झाले आणि तो तिला मारहाण करु लागला.

    डोळ्यादेखत मुलीला मारत असल्याने संतापलेले वडील गुरुप्रसाद मध्ये पडून त्याला मारायला लागले. मारहाण करताना सुरेश खाली पडला, त्यावेळी भावोजींच्या सततच्या तमाशाला कंटाळलेल्या बृजेशने बाईकमधून पेट्रोल काढून भावोजीवर टाकले. नंतर माचिसची पेटती काडी टाकून त्यांना जाळले. अखेर घरातल्या लोकांनी आग विझवून त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केले.

    घटनेची माहिती मिळताच सुरेशच्या घरचेही तिथे आले. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार सुरेशचे त्याच्या सासरच्यांशी पटत नव्हते. त्यांच्यात वाद व्हायचे. तर सुरेशच्या पत्नीने दिलेल्या माहितीनुसार त्याच्या लग्नाला १७ वर्षे झाली असून तिचा नवरा कायम दारु पिऊन मारहाण करतो. त्यामुळे ती वरचेवर मुलांसोबत माहेरी येऊन राहते. याप्रकरणी ललपुरा ठाण्याचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश यादव यांनी घटनेचा तपास सुरु असल्याचे सांगितले आहे.

    he went to her sister in-laws wedding but his brother in law threw petrol on his body and set it on fire