आतापासुन सुर्य ओकतोय आग! फेब्रुवारीत उष्णतेनं 122 वर्षांचा विक्रम मोडला; मुलांना पार्क केलेल्या कारमध्ये सोडू नका, दुपारी बाहेर पडू नका, केंद्राचे निर्देश

गरज नसल्यास दुपारी १२ ते ३ या वेळेत घराबाहेर पडू नका. बाहेर पार्क केलेल्या कारमध्ये मुलांना कधीही एकटे सोडू नका. असे निर्देश हवामान खात्याने दिले आहे.

फेब्रुवारी महिना संपतानाच मैदानी भागातील उन्ह वाढायला सुरुवात झाली आहे. या उष्णतेनं फेब्रुवारीतील (February heat ) १२२ वर्षांचा विक्रम मोडला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर आणि मध्य भारतात दिवसाचे सरासरी तापमान सामान्यपेक्षा 1.73 अंश सेल्सिअस जास्त होते. यापूर्वी 1901 मध्ये फेब्रुवारीमध्ये 0.81 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. या पार्श्वभुमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मार्च ते मे या कालावधीत उष्णतेच्या लाटेबाबत सूचना जारी केल्या आहेत.

हवामान खात्यानं दिल्या काह सूचना

हवामान खात्याने 2023 मध्ये पहिल्यांदाच उन्हाळ्याबद्दल इशारा दिला आहे. त्यादृष्टीने काय करावे आणि काय करू नये याची यादी जारी करण्यात आली आहे. यानुसार गरज नसल्यास दुपारी १२ ते ३ या वेळेत घराबाहेर पडू नका. बाहेर पार्क केलेल्या कारमध्ये मुलांना कधीही एकटे सोडू नका. असे निर्देश देण्यात आले आहेत.

दरम्यान, फेब्रुवारीमध्ये उत्तर आणि मध्य भारतात जास्त उष्णता असते. उत्तर पश्चिम भारतात म्हणजे राजस्थान, पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेशमध्ये फेब्रुवारीचं सरासरी दिवसाचे कमाल तापमान 24.86 डिग्री सेल्सियसपेक्षा 3.40 डिग्री सेल्सियस जास्त नोंदवण्यात आले. यापूर्वी 1960 मध्ये फेब्रुवारीमध्ये हे तापमान 24.55 अंशांवर पोहोचले होते. मध्य भारतातील (मध्य प्रदेश, महाराष्ट्र, छत्तीसगड आणि गुजरात) इतिहासातील हा दुसरा सर्वात उष्ण फेब्रुवारी होता. यंदा फेब्रुवारीचे सरासरी कमाल तापमान ३१.९३ अंश होते. 2006 मध्ये ते 32.13 अंशांवर नोंदवले गेले होते