
चेन्नईच्या मीनांबक्कममध्ये पहाटे 5.30 वाजेपर्यंत 13.7 सेंटीमीटर पावसाची नोंद झाली आहे. रात्रभर पडलेल्या पावसामुळे या भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे. दरम्यान, हवामान विभागाने आज मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला होता.
तामिळनाडू: महाराष्ट्रात तितका पाऊस झाला नसला तरी इतर राज्यांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे. असह्य उकाड्यानंतर तामिळनाडूतील चेन्नईमध्ये (Chennai Rains) झालेल्या मुसळधार पाऊस कोसळला आहे. त्यामुळे तामिळनाडू राज्यातील चेन्नई, चेंगलपट्टू, कांचीपूरम, वेल्लोर, रानीपेट आणि तिरुवल्लूर जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर (School Holiday In Chennai) करण्यात आली आहे. (Tamilnadu Rains)
#WATCH | Tamil Nadu | Overnight widespread rainfall and moderate rainfall in Chennai left some parts of the city waterlogged today.
Visuals from Sri Sakthi Nagar, Arumbakkam in Chennai. pic.twitter.com/ogusm1L4qP
— ANI (@ANI) June 19, 2023
विमानांचं बंगळुरुला लँडिंग
पावसामुळे आणि खराब हवामानामुळे परदेशातून चेन्नईत येणारी विमानं आता बंगळुरूला वळवण्यात आली आहेत. कारण 18 जूनला चेन्नईमध्ये अतिवृष्टी झाली. तसंच अनेक आंतरराष्ट्रीय विमानांना चेन्नईत यायला उशीर झाला. दोहा आणि दुबईवरून आलेल्या 10 विमानांना बंगळुरूच्या विमानतळाकडे डायव्हर्ट करण्यात आलं आहे.आंतरराष्ट्रीय विमानांचं वेळापत्रक पूर्णपणे कोलमडलं आहे.
चेन्नईच्या मीनांबक्कममध्ये पहाटे 5.30 वाजेपर्यंत 13.7 सेंटीमीटर पावसाची नोंद झाली आहे. रात्रभर पडलेल्या पावसामुळे या भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे. दरम्यान, हवामान विभागाने आज मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला होता. चेन्नई आणि काही जिल्ह्यांमध्ये 21 जूनपर्यंत हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
13 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता
हवामान विभागाकडून जारी करण्यात आलेल्या अंदाजानुसार, सोमवारी तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि कराईकलच्या अनेक भागांमध्ये हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडू शकतो. दुसरीकडे कांचीपुरम, चेंगपट्टू, तिरुवन्नामलाई, कल्लाकुरिची, विल्लुपुरम, कुड्डालोर, माइलादुथुराई, नागापट्टिनम, तिरुवरून तंजावुर, त्रिची,अरियालुर, पेरम्बलुरसहित 13 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यासाठी शासनाकडून आवश्यक खबरदारी घेतली जात आहे.