कर्नाटकात मुसळधार पावसाने 24 जणांचा मृत्यू, ६५८ घरांचे नुकसान

आठवडाभरापासून कर्नाटकमध्ये पावसाने थैमान घातलं आहे. पावसामुळे जीवीतहानी झाली आहे. मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसानही झालेय. जनजीवन विस्कळीत झालेय. जवळपास पाच लाख हेक्टर जमीनीवरील पिकं पाण्यात गेली आहेत. कर्नाटकमधील 658 घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, 8495 घरांचे अंशत: नुकसान झाले आहे. 191 जनावरांचा मृत्यू झाला आहे. कर्नाटकमधील परिस्थितीचा मुख्यमंत्री बोम्मई यांनी आढावा घेतला आहे. तर, घर गमावलेल्यांना मदतीचा पहिला हप्ता म्हणून प्रत्येकी एक लाख रुपये तातडीने देण्याची कार्यवाही करण्यात आली आहे.

    कर्नाटकात मुसळधार पावसाने कहर केला आहे. पाऊस आणि पुराशी संबंधित घटनांमध्ये 24 जणांचा मृत्यू झाला आहे. ६५८ घरांचे पूर्ण नुकसान झाले, तर ८,४९५ घरांचे अंशत: नुकसान झाले. ५ हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील पिके नष्ट झाली आहेत. यासोबतच १९१ जनावरांचाही मृत्यू झाल्याची माहिती आहे.

    अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे दक्षिण भारतात पावसाने थैमान घातलं आहे. चार दिवसांपासून कर्नाटकमध्ये पावसाने हजेरी लावली आहे. मुसळधार पावसामुळे कर्नाटकमधील जनजीवन विस्कळीत झालं आहे. हजारो लोक बेघर झाले आहेत. रस्त्यावर आणि शेतात पाणीच पाणी झालं आहे. पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झालेय. मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे कर्नाटकमध्ये आतापर्यंत 24 जणांचा मृत्यू झालाय. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आढावा बैठक घेत शेतकऱ्यांसाठी मदतीची घोषणा केली आहे.

    आठवडाभरापासून कर्नाटकमध्ये पावसाने थैमान घातलं आहे. पावसामुळे जीवीतहानी झाली आहे. मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसानही झालेय. जनजीवन विस्कळीत झालेय. जवळपास पाच लाख हेक्टर जमीनीवरील पिकं पाण्यात गेली आहेत. कर्नाटकमधील 658 घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, 8495 घरांचे अंशत: नुकसान झाले आहे. 191 जनावरांचा मृत्यू झाला आहे. कर्नाटकमधील परिस्थितीचा मुख्यमंत्री बोम्मई यांनी आढावा घेतला आहे.

    दरम्यान, घर गमावलेल्यांना मदतीचा पहिला हप्ता म्हणून प्रत्येकी एक लाख रुपये तातडीने देण्याची कार्यवाही करण्यात आली आहे. पीक नुकसान विम्याची रक्कम विमा कंपन्यांकडून लवकरात लवकर वाटप करण्यासाठी कार्यवाही करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. पावसानंतर तातडीने रस्ते दुरुस्तीचे काम सुरू करण्याचे आदेश बैठकीत देण्यात आले आहेत.