da hike

केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये (DA Hike) ५ टक्क्यांची वाढ केली आहे. ही वाढ १ जुलैपासून लागू होणार आहे.

    केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये (DA Hike) ५ टक्क्यांची वाढ केली आहे. ही वाढ १ जुलैपासून लागू होणार आहे. सरकारकडून महागाई भत्त्यात (DA Hike Of Central Government Employees) ५ टक्क्यांची वाढ करण्यात येणार आहे. महागाई भत्त्यामध्ये ५ टक्क्यांची वाढ झाल्यावर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये जवळपास ३४००० रुपयापर्यंत वाढ होऊ शकते. या वाढीमुळे महागाई भत्ता आता ३९ टक्के इतका होणार आहे.

    महागाई भत्त्यात होणारी वाढ ऑल इंडिया कन्झ्युमर प्राइज इंडेक्स ( All India Consumer Price Index) (AICPI) च्या आकडेवारीने होते. एआयसीपीआयनुसार (AICPI), केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याबाबतचा निर्णय घेतला जातो. एआयसीपीआयच्या निर्देशांकानुसार, मार्च २०२२ पासून महागाईत वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना पाच टक्के महागाई भत्ता वाढवून मिळण्याची शक्यता आहे.

    केंद्र सरकारकडून वर्षातून दोनदा साधारणपणे जानेवारी आणि जुलै महिन्यात महागाई भत्त्यामध्ये वाढ करण्यात येते.
    वर्ष २०२२ च्या सुरुवातीला जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये महागाई निर्देशांकात घट झाली असल्याचे दिसून आले होते. त्यानंतर यामध्ये सातत्याने वाढ होत आहे.