cow cess on liquor sell

हिमाचल प्रदेश सरकारने दारु विक्रीवर प्रत्येक बाटलीमागे दहा रुपये गोमाता अधिभार (Cow Cess On Liquor Bottle Sell) लावल्यामुळे वर्षाला 100 कोटी रुपयांचा महसूल त्यांना प्राप्त होणार आहे.

हिमाचल प्रदेश सरकारने (Himachal Pradesh) आज एक मोठी घोषणा केली आहे. हिमाचल प्रदेश सरकारने दारु विक्रीवर प्रत्येक बाटलीमागे 10 रुपये गोमाता अधिभार (Cow Cess) लावण्याचा निर्णय घेतला आहे. हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू (Sukhavinder Singh Sukhu) यांनी आज राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्पामध्ये त्यांनी अनेक घोषणा केल्या पण गोमाता अधिभाराच्या घोषणेची विशेष चर्चा आहे. राज्याचा महसूल वाढवण्यासाठी हिमाचल प्रदेश सरकारने हा निर्णय घेतला आहे. हिमाचल प्रदेश सरकारने दारु विक्रीवर प्रत्येक बाटलीमागे दहा रुपये गोमाता अधिभार (Cow Cess On Liquor Bottle Sell) लावल्यामुळे वर्षाला 100 कोटी रुपयांचा महसूल त्यांना प्राप्त होणार आहे. मात्र निर्णयामुळे हिमाचल प्रदेशमध्ये आता दारु महाग होणार आहे.

हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू यांनी आज आपला पहिला अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये त्यांनी अनेक घोषणा केला. या अर्थसंकल्पामुळे राज्याला नवीन दिशा मिळेल, असं मत त्यांनी व्यक्त केलं. अर्थसंकल्पामध्ये बेरोजगारांना व्यवसायासाठी 40 टक्के सबसिडी देणार असल्याचं जाहीर करण्यात आलं. तसेच 30 हजार कार्यात्मक पदांसाठी भरती प्रक्रिया होणार असल्याचं सांगण्यात आलं. यासह अंगणवाडी सेविकांना 9 हजार 500 रुपये मानधन, अंगणवाडी मदतनीस आणि आशा सेविकांना5 हजार 200 मानधन दिलं जाणार आहे. आमदारांसाठी महत्त्वाची घोषणा सरकारने केली. आमदार निधी आता 2 कोटींवरुन 2.10 कोटी करण्यात आला आहे. रोजगार हमी योजनेच्या मजुरांच्या मजुरीमध्ये 25 रुपयांनी वाढ करण्यात आलेली आहे. त्यामुळे त्यांना आता 375 रुपये मजुरी मिळेल.

हिमाचल सरकारने मुलींना उच्च शिक्षणासाठी इलेक्ट्रीक स्कूटी खरेदीसाठी 25 हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. हिमाचल प्रदेशमधील 20 हजार मुलींना याचा फायदा होणार आहे. तसेच चार्जिंग स्टेशनसाठी 50 टक्के अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.