दिवसातून 5 वेळा नमाज पढू लागला हिंदू मुलगा, आता ऑनलाईन गेम्सच्या माध्यामातूनही धर्मांतरण, तुमच्या मुलाकडं तुमचं लक्ष आहे ना?

संजयनगरमध्ये असलेल्या एका मशिदीत मुलगा नमाज पढत असताना त्यांनी पाहिलं. हे पाहिल्यावर या वडिलांच्या पायाखालची वाळूच सरकली. मुलाला विचारलं असता, त्यानं मुस्लीम धर्म इतर धर्मांपेक्षा चांगला असल्याचं सांगत, मुस्लीम धर्म स्वीकारल्याचं सांगीतलं.

  नवी दिल्ली– एका अल्पवयीन मुलानं धर्मांतरण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या मुलाच्या वडिलांनी दुसऱ्या धर्मातील मुंबईत (Mumbai) राहणारे काही युवक आणि अन्य काही जणांवर या प्रकरणी मुलाला फूस लावण्याचा आरोप केला आहे. या प्रकरणात मुलाच्या वडिलांनी पोलिसांत (Police) तक्रारही दाखल केलीय. हा मुलगा जिमला जातो असे सांगून घरातून पाच वेळा बाहेर जात असे. वडिलांना त्याचा संशय आला, त्यांनी या मुलाचा पाठलाग केला. त्यावेळी हा मुलगा पाच वेळची नमाज पढत होता, असं समोर आलं. पोलीस आता या प्रकरणात अधिक चौकशी करीत आहेत. गाझियाबाद जिल्ह्यात कवीनगरमध्ये हा प्रकार घडलाय. (Online Games)

  कसा उघडकीस आला प्रकार

  राजनगरमध्ये राहणाऱ्या या व्यक्तीने सांगितलं की, त्यांचा अल्पवयीन मुलगा गेल्या काही दिवसांपासून घरात विचित्र वागत होता. जिमला जातो असं सांगून दिवसभरातून पाच वेळा घराच्या बाहेर जात होता. तसचं अनेक तासांनी तो घरी परतत असे. संशय आल्यानंतर त्याच्या वडिलांनी या मुलाचा पाठलाग केला. त्यावेळी संजयनगरमध्ये असलेल्या एका मशिदीत मुलगा नमाज पढत असताना त्यांनी पाहिलं. हे पाहिल्यावर या वडिलांच्या पायाखालची वाळूच सरकली. मुलाला विचारलं असता, त्यानं मुस्लीम धर्म इतर धर्मांपेक्षा चांगला असल्याचं सांगत, मुस्लीम धर्म स्वीकारल्याचं सांगीतलं. या पीडित पित्यानं जेव्हा या मुलाच्या मोबाईल आणि लॅपटॉपची झाडाझडती घेतली, त्यावेळी त्यात मुस्लीम धर्माचं साहित्य सापडलं. यातला काही भाग हा बेकायदेशीरही होता.

  ऑनलाईन गेमिंग ते धर्मांतर

  या मुलाची खोलात जाऊन चौकशी केली असता त्याचं धर्मांतरण कसं करण्यात आलं, तेही समोर आलंय. ऑनलाईन गेमिंगच्या माध्यमातून हा अल्पवयीन मुलगा मुंबईतील काही मुस्लीम तरुणांच्या संपर्कात आला. यातील एक तरुण बद्दोनं दोन वर्षांपूर्वी या मुलाला काही कॉम्प्युटरचे पार्ट विकले होते. जुलै २०२१ मध्ये या बद्दोला २० हजार रुपये ट्रान्सफर करण्यात आले होते. तेव्हापासून हा मुलगा या बद्दोच्या प्रभावात असल्याचा पित्याचा आरोप आहे. या बद्दो आणि इतर काही जणांशी तो तासनतास फोनवर बोलत असे. आता मुलाच्या धर्मांतरणामुळं चिंतेत असल्याचं पित्याचं म्हणणंय.

  देशविरोधी कारवायातं सामील होण्याची चिंता

  हा अल्पवयीन मुलगा असमंजस असल्याचं पित्याचं म्हणणं आहे. त्याला उकसवून, आमिष लाखवून त्याचं धर्मांतरण करण्यात आल्याचा पित्याचा दावा आहे. देशविरोधी कारवायात मुलाचा वापर होऊ नये, याची त्यांना भीती वाटतेय. संजयनगरमधील मशिदीतील काही जणांवरही या षडयंत्रात सहभागी असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या प्रकरणात आता पोलिसांनी बद्दो आणि मुंबईतल्या काही तरुणांविरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांना यात काही तथ्य सापडली तर पुढील तपास करण्यात येणार आहे.