मध्यप्रदेश : शाळेत ८ मुलांचे ख्रिस्ती धर्मांतरण केल्याचा हिंदू संघटनांचा आरोप, ऐन परीक्षा सुरु असताना मिशनरी स्कूलमध्ये तोडफोड

दुसरीकडे विद्यार्थ्यांच्या धर्मातंरणाचा आरोप पूर्णपणे फेटाळत, शाळेने जिल्हाधिकाऱ्यांकडे या प्रकरणी तक्रार नोंदवली आहे. या कथित धर्मांतरणाला विरोध करण्यासाठी आंदोलन आणि घेराव करणार असल्याचे विहिंप आणि बंजरग दलाने जाहीर केले होते. पोलिसांनी याकडे फारसे गांभिर्याने पाहिले नाही

    विदीशा : विद्यार्थ्यांचे धर्मांतरम करण्यात येत असल्याचा आरोप करत, एका मिशनरी स्कूलमध्ये परीक्षा सुरु असताना हिंदू संघटनांनी तोडफोड केल्याची घटना घडली आहे. मध्य प्रदेशात विदिशामध्ये गंज बासौदा येथे सेंट जोसेफ स्कूलमध्ये हा प्रकार घडला आहे. स्कूलमध्ये १२ वीची परीक्षा सुरु असताना, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी शाळेवर हल्ला केला. माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहचले आणि त्यांनी गर्दीला आवपर घातला. या प्रकरणी पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

    दुसरीकडे विद्यार्थ्यांच्या धर्मातंरणाचा आरोप पूर्णपणे फेटाळत, शाळेने जिल्हाधिकाऱ्यांकडे या प्रकरणी तक्रार नोंदवली आहे. या कथित धर्मांतरणाला विरोध करण्यासाठी आंदोलन आणि घेराव करणार असल्याचे विहिंप आणि बंजरग दलाने जाहीर केले होते. पोलिसांनी याकडे फारसे गांभिर्याने पाहिले नाही. प्रत्यक्ष दोलोनावेळी गेट तोडून आणि भिंतींवर चढत कार्यकर्ते शाळेच्या आवारत शिरले. तिथे उभ्या असलेल्या कार आणि शाळेच्या वर्गांच्या खिडक्या तोडण्यात आल्या. हा सगळा गोंधळ सुरु असताना, दुसरीकडे विद्यार्थी परीक्षा देत होते. सुरुवातीला आंदोलनाच्या ठिकाणी केवळ ४ पोलीस तैनात करण्यात आले होते. हा सर्व प्रकार सुरु झाल्यानंतर पोलिसांची जादा कुमक घटनास्थळी पोहचली. ३० ऑक्टोबरला एका ख्रिस्ती धर्माच्या कार्यक्रमात गोपनीय रित्या ८ मुलांचे धर्मांतरण करण्यात आल्याचा आरोप विहिंप आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. ख्रिस्ती धर्मीयांकडून धर्मांतरणाचे हे राज्यातील चौथे प्रकरण आहे.