नेपाळमध्ये हॉटेल, उत्तर प्रदेशात मोठं घर स्वत:च्या नावे हॉस्पिटल, गेस्ट हाऊस अन् बरंच काही; महिन्याला लाखोंची कमाई, तरीही ‘तो’ करायचा चोरी

चोरी करण्यासाठी चोर कोणती आयडिया करेल (Theft News) याचा काही नेम नसतो. चोरी करण्याची चोरट्याची ही सवय काही केल्या जात नसल्याचे म्हटले जाते. असाच प्रकार राजधानी दिल्लीतून (Crime in Delhi) समोर आला आहे. दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) एका चोरट्याला अटक केली.

  नवी दिल्ली : चोरी करण्यासाठी चोर कोणती आयडिया करेल (Theft News) याचा काही नेम नसतो. चोरी करण्याची चोरट्याची ही सवय काही केल्या जात नसल्याचे म्हटले जाते. असाच प्रकार राजधानी दिल्लीतून (Crime in Delhi) समोर आला आहे. दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) एका चोरट्याला अटक केली. त्याची अधिक चौकशी केली असता तो कोट्यधीश असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याच्या नावावर नेपाळमध्ये हॉटेल तर उत्तर प्रदेशात स्वत:च मोठं घर असल्याचेही समोर आले आहे.

  मनोज चौबे असे या 48 वर्षीय चोरट्याचं नाव आहे. नेपाळच्या जवळ असलेल्या उत्तर प्रदेशच्या सिद्धार्थ नगर जिल्ह्यात मनोज राहायचा. त्यानंतर तो नेपाळमध्ये स्थायिक झाला. 1997 मध्ये तो दिल्लीला आला आणि कीर्ती नगर पोलीस ठाण्यात कँटिन चालवू लागला. कँटिनमध्ये चोरी करताना तो पकडला गेला. त्याची रवानगी तुरुंगात करण्यात आली. तुरुंगात सुटका झाल्यानंतर तो घरफोड्या करु लागला. मोठी रक्कम हाती लागल्यावर तो गावी परतायचा. त्याने या चोरीच्या माध्यमातून कोट्यवधींची संपत्ती जमवली. 2001 ते 2023 या कालावधीत त्याच्यावर 15 पेक्षा अधिक गुन्हे दाखल झाले आहेत.

  नऊवेळा अटक

  मनोज चौबे याने चोरीच्या माध्यमातून कोट्यवधींची संपत्ती जमा केली. गेल्या 25 वर्षांपासून तो कुटुंबापासून दूर राहत दुहेरी आयुष्य जगत होता. त्यानं एकट्यानं 200 चोऱ्या केल्याचे समोर आले आहे. त्याला नऊवेळा अटकही झाली आहे.

  महिन्याला 2 लाखांचं भाडं

  दिल्लीपासून नेपाळपर्यंत चोरट्याच्या मालमत्ता आहेत. सिद्धार्थ नगरच्या शोहरतगढमध्ये त्यानं पत्नीच्या नावे गेस्ट हाऊस बांधलं. याच परिसरात जमीन विकत घेत त्यानं रुग्णालय उभारलं आणि ते चालवण्यास दिलं. त्यातून त्याला महिन्याला 2 लाखांचं भाडं मिळायचं.