खेळाच्या मैदानावर डान्स करणाऱ्या परदेशी मुली कशा बनतात चीअर लीडर्स? त्यांना पगार किती मिळतो? माहितीये का…

चीअरलीडर्सला चांगला पगार मिळतो. फ्रँचायझी त्याला एका हंगामासाठी करारबद्ध करते, जे सुमारे $20,000 पर्यंत असू शकते, म्हणजे भारतीय चलनात सुमारे 17 लाख रुपये मिळतात.

मैदानावर जेव्हा खेळाडु चौकार, षटकार लगावतो तेव्हा स्टेडियवर उपस्थित असेलेल्या सुंदर मुली मैदानावर एक वेगळ्या शैलीत डान्स करुन त्यांच अभिनंदन करतात. हजारे प्रेक्षकांसमोर या चिअरलीडर्सने सर्वांचे लक्ष वेधून घेतात. चौकार आणि षटकारांमध्ये  विशिष्ट शैलीत नाचणाऱ्या या परदेशी मुली म्हणजे चिअरलीडर्स बद्दल सर्वांना कौतुहल असतं. आयपीएलचा भाग होण्यासाठी केवळ परदेशातून दरवर्षी भारतात येणाऱ्या चीअरलीडर्सचं आयुष्य नेमकं कसं असतं माहिती आहे का? या कामाचे त्यांना किती पैसे मिळतात? या चीअरलीडर्सना भारताच्या खेळाच्या मैदानावर नेमक्या येतात तरी कशा? चला सर्व काही जाणून घेऊया.

हे चीअरलीडर्स कुठून येतात? 

आयपीएलच्या या चीअरलीडर्स युरोपातील छोट्या-मोठ्या देशांतून एजन्सीमार्फत येतात. या मुली व्यावसायिक डान्सर्स असतात. त्या अनेक देशांमध्ये फिरुन नृत्याचे कार्यक्रम करतात. युरोपियन देशांमध्ये चीअरलीडिंग हा एक व्यवसाय बनला आहे. या व्यवसायासाठी केवळ नृत्य येत असुन उपयोग नाही तर त्यासाठी बरीच मेहनत मुलींना करावी लागते. त्यासाठी या मुलींनी डान्ससोबत स्वताच्या आरोग्य आणि सौंदर्याकडेही लक्ष द्यावं लागतं.    लवचिक शरीराची असणं गरजेच असतं, त्यासाठी कठोर परिश्रम आणि प्रशिक्षण त्यांना घ्यावं लागतं. मैदानावर खेळाडू जेवढी मेहनत करतात तेवढीच मेहनत त्यांनाही करावी लागते.

चीअरलीडर्सला  पगार किती मिळतो? 

चीअरलीडर्सला चांगला पगार मिळतो. फ्रँचायझी त्याला एका हंगामासाठी करारबद्ध करते, जे सुमारे $20,000 पर्यंत असू शकते, म्हणजे भारतीय चलनात सुमारे 17 लाख रुपये. याशिवाय पार्टी परफॉर्मन्स बोनस, एलिमिनेटर बोनस वेगळा आहे. युरोपियन चीअरलीडर्स आणि इतर देशांतील चीअरलीडर्स यांच्या पगारात मोठी तफावत असल्याचेही येथे नमूद करणे आवश्यक आहे. नर्तिकेचे वय, सौंदर्य, अनुभव आणि शरीरयष्टी यावरही पगार अवलंबून असतो. चीअरलीडर्सना सामन्यापूर्वी किंवा नंतर संध्याकाळच्या पार्ट्यांमध्ये परफॉर्म करण्यासाठी अतिरिक्त पैसे दिले जातात. या चीअरलीडर्स मानतात की ते जेवढी मेहनत करतात, त्यानुसार पगार कमी असतो. 

असभ्य वर्तणुकीचा कारावा लागतो सामना

 एका जुन्या मुलाखतीत, दिल्ली कॅपिटल्सच्या चीअरलीडर्सनी सांगितले होते की, त्यांना भारतात सेलिब्रिटींसारखे वाटते. लोक त्यांच्यासोबत सेल्फी काढतात, पण काही लोक वातावरणही बिघडवतातही, जेव्हा आपण मैदानात  नाचतो तेव्हा लोकं आम्हाला घाणेरड्या नजरेनं पाहतात. चीअरलीडिंग हा आमचा व्यवसाय आहे. मात्र, लोक आपल्या शरीरावर टिप्पणी करतात. अश्लील हावभाव करतात. पण आम्ही  हे सगळं व्यावसायिकपणे  हाताळतो.