या महाराजांना कसं कळंत की, लोकांच्या मनात काय चाललंय? जाणून घ्या या साधूबाबत, बाबांचं सर्वात मोठं रहस्य जगासमोर

मध्यप्रदेशातील बागेश्वर धाम सरकार हे नाव सध्या देशभरात प्रसिद्ध झालेलं आहे. या बेगाश्वर महाराजांच्या दरबारात देशभरातून अनेक जणं येतायेत आणि महाराजांना भेटण्याचा प्रयत्न करतात. या सगळ्यात सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हाच आहे की हे महाराज लोकांच्या मनातलं जाणून घेतात तरी कसं?

  रायपूर : बागेश्वर धाम (Bageshwar Dham) म्हणून प्रसिद्ध असेलल्या तीर्थस्थळी कथा वाचक असलेले पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री (Pandit Dhirendra Krishna Shastri) सध्या प्रचंड चर्चेत (Very Popular) आहेत. बागेश्वर महाराज (Bageshwar Maharaj) या नावानं सध्या धीरेंद्र कृष्ण पंडित ओळखले जातात. बागेश्वर महाराज हे लोकांच्या मनात काय चाललंय (What is going on in people’s minds), हे अचूक ओळखतात, असा दावा करण्यात येतोय.

  या बागेश्वर सरकारांच्या दरबारात एकदा हजेरी लावली तर नशीबच पालटंत अशी श्रद्धा सध्या लोकांच्या मनात आहे. हे महाराज लोकांची समस्या केवळ त्यांच्या चेहऱ्याकडे पाहून जाणतात, असा समज आहे. त्यानंतर एका कागदावर त्या व्यक्तीला त्याला भेडसावत असलेल्या समस्येचं ते उत्तर लिहून देतात, अशी धारणा आहे. त्यानंतर लागलीच ती अडचण दूर होते अशी वंदताही त्यांच्याबाबत आसपासच्या परिसरात आहे.

  यामुळेच मध्यप्रदेशातील बागेश्वर धाम सरकार हे नाव सध्या देशभरात प्रसिद्ध झालेलं आहे. या बेगाश्वर महाराजांच्या दरबारात देशभरातून अनेक जणं येतायेत आणि महाराजांना भेटण्याचा प्रयत्न करतात. या सगळ्यात सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हाच आहे की हे महाराज लोकांच्या मनातलं जाणून घेतात तरी कसं?

  काय आहे या महाराजांचा दावा ?

  हे बागेश्वर महाराज दावा करतात की त्यांच्याकडे अशी आध्यात्मिक शक्ती आहे, की ज्यामुळं त्यांना समोरच्या माणसाला बघून त्याच्या मनात काय सुरु आहे, याचा अंदाज येतो. भगवंतांशी असलेल्या अनुसंधानातून हे होतं असा त्यांचा दावा आहे. देवाकडून येणाऱ्या संकेतानुसार ते प्रत्येकाला त्याच्या मनातल्या शंकांचं उत्तर लिहून देतात अशीही धारणा आहे. त्यामुळे सध्या त्यांच्याकडं मोठ्या प्रमाणात गर्दी वाढतेय.

  कसं काय जाणतात मनात काय चाललंय?

  हे बागेश्वर महाराज कुणाच्या मनात काय चाललंय हे कसं जाणून घेतात, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. तज्ज्ञांच्या मते ही एक कला आहे. जेव्हा आपण एखाद्या गोष्टीचा विचार करतो, त्याचे पडसाद आपल्या चेहऱ्यावर उमटत असतात. हे भाव वाचता आले तर कुणाच्या मनात काय चाललंय याचा अचूक अंदाज येऊ शकतो, असं तज्ज्ञांचं मत आहे. ब्रेल लिपीत ज्या पद्धतीनं दृष्टी नसणारे जसं समजून घेऊन लिहू शकतात, तसंच हे आहे. अशा काही व्यक्ती आहेत की ज्या लोकांच्या चेहऱ्यावरुन त्यांच्या मनात काय चाललंय हे समजू शकतात.

  हाव भाल आणि शारिरिक हालचालींसोबतच त्या व्यक्तीच्या व्यवहारावरुनही याचा अंदाज लावता येणं शक्य असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. ती व्यक्ती काय बोलते यावरुनही त्याच्या मनात काय चाललंय याचा अंदाज सहज बांधता येऊ शकतो, असंही तज्ज्ञ सांगातयेत. काहीजणं हे संमोहनाचा वापर करुनही मनात काय चाललंय जाणून घेऊ शकतात. सुहानी नावाची एक मुलगीही आहे तीही अशाच प्रकाराने लोकांच्या मनात काय चाललंय हे ओळखू शकते.

  मोठमोठ्या मुद्द्यांवर बागेश्वर महाराज देतात मत

  हिंदूना चेतना देण्यासाठी कार्यरत असल्याचं हे बागेश्वर महाराज सांगतात. देशातील अनेक महत्त्वाच्या आणि मोठ्या मुद्द्यांवर, विषयावर ते त्यांचं मतही व्यक्त करीत असतात. कुटुंबासाठी नव्हे तर समाजाला जागृत करण्यासाठी कार्यरत असल्याचं ते अनेकांना सांगतात. धर्मांतरणाच्या विरोधात मोठं कम उभं करण्याची गरजही ते व्यक्त करतात.

  सूचना- नवराष्ट्रचा हेतू कोणत्याही अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचा नाही. तसचं कुणाच्या श्रद्धेला दुखावण्याचा हेतूही या बातमीमागे नाही.