इराणने केलेल्या हल्ल्यात इस्रायलच किती नुकसान झाले? सत्य आले समोर

मागील काही दिवसांपासून इस्रायल आणि इराण यांचे जागतिक स्थरावर युद्ध चालू आहे. या युद्धाचे पडसाद संपूर्ण जगभरात उमटले आहेत.यामुळे मोठ्या प्रमाणवर आर्थिक नुकसान देखील झाले आहे.

  मागील काही दिवसांपासून इस्रायल आणि इराण यांचे जागतिक स्थरावर युद्ध चालू आहे. या युद्धाचे पडसाद संपूर्ण जगभरात उमटले आहेत.यामुळे मोठ्या प्रमाणवर आर्थिक नुकसान देखील झाले आहे. आक्रमक झालेल्या इराणकडून इस्रायलवर हल्ले केले जात आहेत. या हल्ल्यामुळे जगभरातील सर्वच देशांच्या चिंतेमध्ये वाढ झाली आहे. इस्रायलच्या रस्त्यावर शनिवारी रात्री मोठा गोधळ झाल्याचे चित्र दिसून आले. तसेच आकाशामध्ये इराणी मिसाइल्स आणि इस्रायली एअर डिफेन्स सिस्टिमची जोरदार टक्कर सुरु होती. त्यामुळे इस्रालचे मोठे नुकसान झाले आहे.

  इस्रायलवर झालेल्या या भीषण हल्ल्याला जवळपास २४ तास उलटून गेले आहेत. मात्र तरीसुद्धा हे युद्ध जागतिक स्थरावर दिसत आहे. रविवारी सोशल मीडियावर याचे मोठ्या प्रमाणावर फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले होते. या हल्ल्यात इस्रायलचे मोठे नुकसान झाले आहे. ही सर्व माहिती सोशल मीडियावर येऊ लागली आहे. अमेरिकेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ABC न्यूजला दिलेल्या माहितीनुसार, इराणकडून डागण्यात आलेले जवळपास ९ मिसाइल्स इस्रायलच्या एअर डिफेन्स सिस्टिमला रोखता आले नाही, त्यामुळे इस्रायलच मोठे नुकसान झाले आहे. पाच बॅलेस्टिक मिसाइल्सनी ‘नेवातिम एअर बेस’वर हल्ला केला.

  दुसरा हल्ला यापेक्षा भयानक असेल

  या हल्ल्यामध्ये सी-१३० ट्रान्सपोर्ट विमान, एक रनवे आणि स्टोरेज सुविधेच मोठे नुकसान झाले आहे. तर चार बॅलेस्टिक मिसाइल नेवातिम एअर बेसवर पडले.बेसच्या इन्फ्रास्ट्रक्चरच काही प्रमाणात नुकसान झाले आहे. सीरियामधून इराणी दुतावासावर झालेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इस्रायलच्या अनेक ठिकाणांवर ड्रोन्स आणि मिसाइल्सनी हल्ला केला आहे. या हल्ल्यात मोठे नुकसान झाले आहे. या हल्ल्यानंतर इराणने इस्रायलला इशारा दिला. तसेच इस्रायलने हल्ल्याला प्रत्युत्तर दिलं, तर दुसरा हल्ला यापेक्षाही भयानक असेल, असे इराणकडून सांगण्यात आले आहे. आमचा इशारा हा इस्रायलला समर्थन देणाऱ्या देशांवर असल्याचे इराणकडून सांगण्यात आले आहे.

  पंतप्रधान मिसाइल प्रूफ घरात केले शिफ्ट

  इराणने टाकलेल्या मिसाईल नंतर पंतप्रधानांना मिसाइल प्रूफ घरात शिफ्ट करण्यात आले आहे. इराणने डागलेली 99 टक्के मिसाइल्स आणि ड्रोन्स एअर डिफेन्स सिस्टिमने हवेतच नष्ट केल्याचे, IDF ने सांगितले आहे. तसेच नुकसान झाल्याचे देखील सांगितले नाही. तसेच देशाची एअर डिफेन्स सिस्टम आणखी मजबूत केली जात आहे.