कुटुंबावर काळाचा घाला, अपघातात २ चिमुरड्यांसह अख्खे कुटुंब ठार

रात्री महामार्गाच्या कडेला कंटेनर उभा होता. गाडीचा वेग वेगात होता. रात्री आठ वाजता अंधार असल्याने अंदाज न आल्याने मागून गाडी कंटेनरमध्ये घुसली. सर्वजण गाडीत अडकले होते, यावरून अपघाताची तीव्रता लक्षात येते. अपघातानंतर स्थानिक घटनास्थळी पोहोचले. त्यांनी पोलिसांना माहिती दिली. कार गॅस कटरने कापून सर्वांना बाहेर काढण्यात आले.

    नवी दिल्ली – उत्तर प्रदेशच्या बस्ती येथे झालेल्या भीषण अपघातात कारमधून प्रवास करणाऱ्या एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू झाला. भरधाव वेगात असलेली कार महामार्गावर उभ्या असलेल्या कंटेनरला धडकली. ही धडक इतकी भयंकर होती की, संपूर्ण कार कंटेनरमध्ये घुसली. या अपघातात पती-पत्नी, आई आणि मुलगी जागीच ठार झाले, तर गंभीर जखमी झालेल्या मुलाचा रुग्णालयात नेत असतानाच अपघात झाला. खजौला पोलीस चौकीजवळ हा अपघात झाला.

    विनोद कुमार हे लखनऊमधील जल निगममध्ये असिस्टंट इंजिनिअर म्हणून कार्यरत होते. रविवारी विनोद कुमार (४२) हे त्यांची आई सरस्वती, पत्नी नीलम (३४), मुलगी श्रेया आणि मुलगा यात्रीथ यांच्यासह संत कबीरनगर येथे दिवाळी साजरी करण्यासाठी कारने जात होते. ते मूळचे खलिलाबाद परिसरातील हरपूर धोडही येथील रहिवासी होते. ब्रेझा कारमधील संपूर्ण कुटुंब लखनऊहून निघाले होते.

    रात्री महामार्गाच्या कडेला कंटेनर उभा होता. गाडीचा वेग जास्त होता. रात्री आठ वाजता अंधार असल्याने अंदाज न आल्याने मागून गाडी कंटेनरमध्ये घुसली. सर्वजण गाडीत अडकले होते, यावरून अपघाताची तीव्रता लक्षात येते. अपघातानंतर स्थानिक घटनास्थळी पोहोचले. त्यांनी पोलिसांना माहिती दिली. कार गॅस कटरने कापून सर्वांना बाहेर काढण्यात आले. क्रेनच्या साहाय्याने गाडी कंटेनरमधून बाहेर काढण्यात आली.

    या अपघातात एई विनोद कुमार, त्यांची आई, पत्नी, मुलगी यांचा जागीच मृत्यू झाला, तर काही वेळाने मुलगा सत्यार्थीचा मृत्यू झाला. एसपी आशिष श्रीवास्तव यांनी सांगितले की, पाच मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहेत. मृताच्या नातेवाइकांना माहिती देण्यात आली.