मी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान केला नाही, सुधांशू त्रिवेदी यांचे स्पष्टीकरण

पत्रकार परिषद घेत याप्रकरणी सुधांशू त्रिवेदी (Sudhanshu Trivedi) यांनी खुलासा केला आहे. तसेच टिका करणाऱ्यावर त्यांनी निशाणा साधला आहे. “छत्रपती शिवाजी महाराज हे महानायकांपैकी एक आहेत, मी अपमान केला नाही तर स्वत:च्या बुद्धीबाबत विचार करा” असं सुधांशू त्रिवेदी यांनी म्हणत विरोधकांचा समाचार घेतला आहे.

    नवी दिल्ली – राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे जुन्या काळातील आदर्श होते. तर आताच्या काळातील नितीन गडकरी हे आदर्श असल्याचं राज्यपालांनी म्हटलं आहे. त्यातच भाजपाचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी (Sudhanshu Trivedi) यांनी देखील “छत्रपती शिवाजी महाराजांनी पाच वेळा पत्र लिहून औरंगजेबची माफी मागितली होती”, असं विधान केल्यानंतर राज्यातील वातावरण तापले असून, भाजपाच्या व राज्यपालांच्या विरोधात आंदोलन केलं जात आहे, तसेच राजकीय वर्तुळातून संतप्त प्रतिक्रिया समोर येत असताना, आता यावर दस्तुरखुद् भाजपाचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी (Sudhanshu Trivedi) यांनी पत्रकार परिषदे घेऊन याप्रकरणी स्पष्टीकरण दिले आहे.

    दरम्यान, आपण मी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान केला नसल्याचं भाजपा प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी म्हटलं आहे. पत्रकार परिषद घेत याप्रकरणी सुधांशू त्रिवेदी (Sudhanshu Trivedi) यांनी खुलासा केला आहे. तसेच टिका करणाऱ्यावर त्यांनी निशाणा साधला आहे. “छत्रपती शिवाजी महाराज हे महानायकांपैकी एक आहेत, मी अपमान केला नाही तर स्वत:च्या बुद्धीबाबत विचार करा” असं सुधांशू त्रिवेदी यांनी म्हणत विरोधकांचा समाचार घेतला आहे. तसेच यावर विनाकारण राजकारण केले जात असल्याचं देखील सुधांशू त्रिवेदी यांनी म्हटलं आहे.