uma bharati

लोक काहीही म्हणत असले तरी मी राजकारण (Politics) सोडले नाही आणि पुढच्या निवडणुका लढवणार असल्याचा दावा भाजपच्या तडफदार नेत्या आणि मध्य प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री उमा भारती (Uma Bharati) यांनी केला.

    सागर : लोक काहीही म्हणत असले तरी मी राजकारण (Politics) सोडले नाही आणि पुढच्या निवडणुका लढवणार असल्याचा दावा भाजपच्या तडफदार नेत्या आणि मध्य प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री उमा भारती (Uma Bharti) यांनी केला.

    बुंदेलखंड प्रदेशातील सागर जिल्ह्यात आयोजित एका जाहीर कार्यक्रमाला संबोधित करताना त्यांनी ही बाब स्पष्ट केली. त्या म्हणाल्या, ‘मी 2019 (लोकसभा) निवडणूक लढवण्यास नकार दिला होता. कारण मी बराच काळ काम करत होते. मी पाच वर्षे ब्रेक घेण्याचा विचार केला होता. परंतु, लोकांना वाटले की मी राजकारण सोडले आहे. मी 75 वर्षांची होवो की 85 वर्षांची, मी राजकारणात सक्रिय राहणार आहे. कारण मला राजकारणात रस आहे’, असे त्यांनी सांगितले.

    केन-बेतवा नदी जोडणी प्रकल्प आणि ललितपुर-सिंगरौली रेल्वे लाईनसह अनेक मोठ्या विकास प्रकल्पांचा संदर्भ देत त्यांनी सांगितले की, राजकारणात असल्यामुळे हे प्रकल्प प्रत्यक्षात साकारता आले. राजकारणाला चैनीचे साधन मानणाऱ्यांमुळे राजकारण बदनाम झाले आहे.