balram bhargav

जिथं कोविडचा पॉझिटिव्हीटी रेट (Covid Positivity Rate) ५ टक्क्यांपर्यंत पोहोचेल त्याठिकाणी जिल्हा स्तरावरील निर्बंध लादले जातील. ओमायक्रॉनचा धोका आणि त्यासंबंधी जागृती करण्यासंदर्भात नियमित बैठका घेतल्या जात आहेत, असं आयसीएमआर(Indian Council of Medical Research)चे प्रमुख बलराम भार्गव (Balram Bhargava) यांनी सांगितलं आहे.

    नवी दिल्ली : जगभरातील ओमायक्रॉनचा प्रसार पाहता देशातल्या सध्याच्या कोरोनाच्या परिस्थितीवर लक्ष ठेवलं जात आहे, असं आयसीएमआर(Indian Council of Medical Research)चे प्रमुख बलराम भार्गव (Balram Bhargava) यांनी सांगितलं आहे.

    ओमायक्रॉनच्या वाढत्या रुग्णसंख्येनंतर त्यांनी अधिकृत निवेदन सादर केलं आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे की जिथं कोविडचा पॉझिटिव्हीटी रेट (Covid Positivity Rate) ५ टक्क्यांपर्यंत पोहोचेल त्याठिकाणी जिल्हा स्तरावरील निर्बंध लादले जातील. ओमायक्रॉनचा धोका आणि त्यासंबंधी जागृती करण्यासंदर्भात नियमित बैठका घेतल्या जात आहेत, असंही त्यांनी सांगितलं आहे.

    ओमायक्रॉनचा धोका ओळखून भारतानं आंतरराष्ट्रीय उड्डाणांवरील बंदी ३१ जानेवारीपर्यंत कायम ठेवली आहे. कारण सुरूवातील दक्षिण आफ्रिकेत(South Africa) आढळलेला ओमायक्रॉन बघता बघता भारतात पोहोचला. दक्षिण आक्रिकेतून डोंबिवलीत आलेला तरूणही ओमायक्रॉनबाधित निघाला. त्यामुळे राज्य सरकारने आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर बंद घालण्याची मागणी केली होती.