तुमच्याकडेही आधारकार्ड आहे ना? मग ‘ही’ महत्त्वाची बातमी वाचाच; देशातील 60 टक्के आधारकार्ड होणार लॉक

देशातील 60 टक्के आधारकार्ड (AADHAR) लॉक होऊ शकतात. मग तुम्ही त्यांचा कुठेही वापर करू शकणार नाही. या आधारकार्डामध्ये तुमचा तर समावेश नाही ना? निष्काळजीपणाचे परिणाम तुम्हाला भोगावे लागू शकतात.

    नवी दिल्ली : देशातील 60 टक्के आधारकार्ड (AADHAR) लॉक होऊ शकतात. मग तुम्ही त्यांचा कुठेही वापर करू शकणार नाही. या आधारकार्डामध्ये तुमचा तर समावेश नाही ना? निष्काळजीपणाचे परिणाम तुम्हाला भोगावे लागू शकतात. सध्या बँक खाते उघडण्यापासून ते ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यापर्यंत प्रत्येक कामासाठी आधार क्रमांक आवश्यक आहे. त्यामुळे तुम्ही वेळीच सावध राहून आधारशी संबंधित औपचारिकता लवकरात लवकर पूर्ण करा.

    ‘युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया’नुसार (UIDAI) ज्यांचे आधार कार्ड जुने आहेत त्यांनी ताबडतोब आधार सेवा केंद्र गाठून केवायसी करून घेणे आवश्यक आहे. एनसीआरमधील आधार सेवा केंद्राच्या अधिकाऱ्याने सांगितले की, असे लोक मोठ्या संख्येने आहेत ज्यांचा पत्ता, मोबाइल नंबर किंवा इतर काहीही आधार कार्ड बनवल्यानंतर बदलले नाही. अशा आधार कार्डधारकांची केवायसी झालेली नाही. असे न केल्यास आधार कार्ड लॉक होईल.

    आधार केंद्रांनुसार, अजूनही जवळपास 60 टक्के असे आधार आहेत ज्यांचे केवायसी अद्याप झालेले नाही. त्यापैकी बहुतांश ग्रामीण भागातील आहेत. या लोकांनी वेळेत केवायसी न केल्यास आधार लॉक होईल. शहरांमध्ये राहणाऱ्या बहुतेक लोकांनी हस्तांतरण किंवा इतर कारणांमुळे एकदाच आधार दुरुस्ती करून घेतली आहे.

    जुन्या आधार कार्डसाठी केवायसी अनिवार्य

    आठ ते दहा वर्षे जुन्या आधार कार्डसाठी केवायसी अनिवार्य होत आहे. या कालावधीत, जर एखादी व्यक्ती परदेशात गेली असेल, तर जेव्हाही तो परत येईल तेव्हा त्याला प्रथम केवायसी करावे लागेल, त्यानंतरच तो आधार वापरू शकतो.