नवरा असावा तर असा ! लग्नाच्या वाढदिवसाचे गिफ्ट म्ह्णून बायकोला थेट चंद्रावर घेऊन दिला प्लॉट

लग्नाचा वाढदिवस लक्षात ठेवणे आणि त्या दिवशी बायकोला काय गिफ्ट द्यायचे याबाबतचे विचार अनेक पुरूषांसाठी कठीण होऊन बसतात. स्त्रियांना आपल्या आयुष्यातील हा दिवस नीट लक्षात असतो आणि नवऱ्याकडून काहीतरी स्पेशल गिफ्ट मिळावे हेही अपेक्षित असत , पण पुरुषांची अशावेळी गोची होते. मात्र सर्वच पुरुष सारखे नसतात.. त्यापैकीच एक आहे राजस्थानचा अजमेरचा धर्मेंद्र अनीजा... या पतिदेवाने स्वतःच्या पत्नीला वाढदिवसानिमित्त तीन एकर जमीन भेट दिली आहे तीपण थेट चंद्रावर!

लग्नाचा वाढदिवस लक्षात ठेवणे आणि त्या दिवशी बायकोला काय गिफ्ट द्यायचे याबाबतचे विचार अनेक पुरूषांसाठी कठीण होऊन बसतात. स्त्रियांना आपल्या आयुष्यातील हा दिवस नीट लक्षात असतो आणि नवऱ्याकडून काहीतरी स्पेशल गिफ्ट मिळावे हेही अपेक्षित असत , पण पुरुषांची अशावेळी गोची होते. मात्र सर्वच पुरुष सारखे नसतात.. त्यापैकीच एक आहे राजस्थानचा अजमेरचा धर्मेंद्र अनीजा… या पतिदेवाने स्वतःच्या पत्नीला वाढदिवसानिमित्त तीन एकर जमीन भेट दिली आहे तीपण थेट चंद्रावर!

धर्मेंद्र म्हणाले की त्यांच्या आठव्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त त्याने चंद्रावर आपल्या पत्नीसाठी जमीन विकत घेतली. ते म्हणाले, ‘२४ डिसेंबर हा आमचा लग्नाचा वाढदिवस होता. मला पत्नीसाठी काहीतरी विशेष करायचे होते. प्रत्येकजण कार आणि दागदागिनेसारख्या ऐहिक गोष्टी भेटी देतात, परंतु मला काहीतरी वेगळे करायचे होते. म्हणून, मी पत्नीसाठी चंद्रावर जमीन खरेदी केली. ‘

धर्मेंद्र यांनी अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरातील ल्युना सोसायटी इंटरनॅशनल या कंपनीमार्फत ही जमीन खरेदी केली आहे. ते म्हणाले की ही खरेदी प्रक्रिया पूर्ण होण्यास सुमारे एक वर्ष लागला. मी खूप आनंदी आहे. माझ्या मते चंद्रावर जमीन विकत घेणारा मी राजस्थानचा पहिला माणूस आहे. ‘ धर्मेंद्रची पत्नी सपना म्हणाली की, पतीकडून अशी विशेष ‘आउट ऑफ द वर्ल्ड’ भेट त्यांना मिळण्याची अपेक्षा नव्हती. मी खूप आनंदी आहे. तो मला काही विशेष देईल अशी मी कधीच अपेक्षा केली नव्हती. मला प्रॉपर्टीच्या कागदपत्रांचे प्रमाणपत्र मिळाले आहे. ‘