विद्यार्थ्यांनो, आता जेएनयूत आंदोलन करणं पडू शकतं महागात; थेट दंडाची केलीये तरतूद

जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (JNU) पुन्हा एकदा नवीन नियम लागू करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. या नियमानंतर येथील विद्यार्थी चांगलेच चिंतेत पडले आहेत. नव्या नियमानुसार, विद्यापीठ परिसरात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून 20 हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे.

    नवी दिल्ली : जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (JNU) पुन्हा एकदा नवीन नियम लागू करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. या नियमानंतर येथील विद्यार्थी चांगलेच चिंतेत पडले आहेत. नव्या नियमानुसार, विद्यापीठ परिसरात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून 20 हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. याशिवाय कोणी देशविरोधी घोषणा दिल्यास 10 हजार रुपयांचा दंड ठोठावला जाईल.

    तसेच जे विद्यार्थी आपल्या हितासाठी वेळोवेळी विद्यापीठात आंदोलने करून मागण्या मांडत होते, त्यांना आता त्या मागण्या मांडता येणार नाहीत. यासाठी 20 हजार रुपयांचा दंड निश्चित करण्यात आला आहे. विद्यापीठात कोणत्याही विद्यार्थ्यांने देशविरोधी घोषणा दिल्यास त्याच्यावर 10 हजार रुपयांचा दंडही ठोठावला जाईल.

    नव्या आदेशानंतर विद्यापीठातील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. दरम्यान, अभाविपचे मीडिया प्रभारी अंबुज तिवारी म्हणाले, हे नवे तुघलकी फर्मान आधीच आले आहे, त्याचा आम्ही विरोध केला होता.