
देशातील विद्यार्थ्यांच्या आत्महत्येच्या वाढत्या घटना पाहता आयआयटी व्यवस्थापनाने अभ्यासाचे ओझे कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.
हैदराबाद येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या (IIT Hyderabad) विद्यार्थिनीने 7 ऑगस्टला वसतिगृहात गळफास लावून आत्महत्या केली होती. मानसिक तणावातून तिने आत्महत्या केल्याची माहिती पुढे आली होती. या प्रकारानंतर देशातील विद्यार्थ्यांच्या आत्महत्येच्या वाढत्या घटना चर्चेचा विषय ठरला आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी आयआयटी प्रशासन प्रयत्न करत असून आता काही नवीन नियम तयार करण्यात आले आहे. आता विद्यार्थ्यांना आठवड्यातून दोनदा पालकांशी बोलावे लागणार आहे. यासोबतच विद्यार्थ्यांच्या वर्तनाचाही मागोवा ॲपच्या माध्यमातून घेतला जाणार आहे.
मुलांनी पालकांसोबत बोलावं
साधारणत: अभ्यासाच्या तणावामुळे आयआयटीत विद्यार्था नैराश्यात जात असल्याच दिसून आलं आहे. त्यामुळे व्यवस्थापनाने अभ्यासाचे ओझे कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारी नोंदीनुसार, 2018 ते 2023 पर्यंत 39 IIT विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. अशा परिस्थितीत आयआयटी दिल्ली विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभाषण व्हावं यासाठी आग्रही आहेत. कारण मुले घरापासून दूर अभ्यास करतात तेव्हा, कुटुंबातील सदस्यांशी बोलणे आणि संपर्कात राहणे यामुळे त्यांना एकटेपणा जाणवणार नाही. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना आठवड्यातून दोनदा पालकांशी बोलावे लागणार आहे. यासोबतच विद्यार्थ्यांच्या वर्तनाचाही मागोवा अॅपच्या माध्यमातून घेतला जाणार आहे.
मुलांना पालकांसोबतच संभाषण रेकॉर्ड कराव लागणार
IIT मद्रासचे संचालक व्ही. कामकोटी यांनी सांगितले की, ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या शैक्षणिक सत्रात आत्महत्या रोखण्यासाठी काही नवीन उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांच्या वर्तनाचा मागोवा घेणारे अॅप विकसित करण्यात आले आहे. यासोबतच पालकांना आठवड्यातून दोनदा पाल्याशी बोलण्यासाठी स्मरणपत्रे पाठवली जातील. मुलांना संभाषणाचे रेकॉर्डिंग देखील करावे लागेल.
फॅकल्टी विद्यार्थ्यांना नियमितपणे भेटणार
आयआयटीचा अभ्यालक्रम बघता विद्यार्थांना अभ्यासाचा तणाव येतो. हा तणाव दूर करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असून त्यांच विद्यार्थ्यांकडे विशेष लक्ष असणार आहे. कॅम्पस कॅन्टीनमध्ये लंच आणि डिनरच्या वेळी विद्यार्थ्यांना फॅकल्टी भेटणार. त्यांच्यामध्ये ओपन हाऊस संवाद होईल. प्रत्येक विद्यार्थ्याच्या समस्या समजून घेणार.
विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यावरही लक्ष देणार
विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यासाठी फॅकल्टी मेंटॉरशिप आणि इंटरएक्टिव्ह व्हर्टिकल देखील तयार केले जातील, जे विद्यार्थ्यांना वर्गानंतर मानसिक आरोग्याच्या टिप्स देतील. वसतिगृहातील विद्यार्थ्यांवरही समुपदेशक लक्ष ठेवणार आहेत. विद्यार्थ्याच्या वर्तणुकीत कोणताही असामान्य बदल ताबडतोब व्यवस्थापनाला कळवला पाहिजे.
आयआयटी मद्रासमध्ये फेस रेकग्निशन अटेंडन्स मॅनेजमेंट सिस्टम, ॲप सुरू
फेस रेकग्निशन अटेंडन्स मॅनेजमेंट सिस्टम, ॲप आयआयटी मद्रासमध्ये सुरू करण्यात आले आहे. विद्यार्थी दोन दिवस क्लास किंवा मेसमध्ये आला नाही, तर मॅनेजमेंट-वॉर्डनला सावधानतेचा संदेश दिला जाईल. यासोबतच मानसशास्त्रज्ञांची एक टीमही तयार करण्यात आली आहे, जी विद्यार्थ्यांशी यादृच्छिकपणे बोलणार आहे.
हे ॲप विद्यार्थ्याच्या गोपनीयतेमध्ये हस्तक्षेप करणार नाही. यातून विद्यार्थ्यांची हजेरीही नोंदवली जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबाबतचा प्रश्नही सोडवला जाईल. जातीभेदाविरुद्ध कठोर धोरण आखले जाईल. विद्यार्थ्यांची आत्महत्या करण्याची प्रवृत्ती ओळखण्यासाठी आयआयटीच्या प्राध्यापकांसाठी विशेष प्रशिक्षणही सुरू करण्यात येणार आहे.