rain

गेले काही दिवस खोळंबलेला मान्सून अरबी समुद्रातून (Arabian Sea) पुढे सरकला आहे. देशात येत्या ५ दिवसात कुठेही उष्णतेची लहर असणार नाही, असे हवामान विभागाने म्हटले आहे. देशात केरळ, माहे आणि तामिळनाडूमध्ये २५ आणि २६ मे रोजी पावसाची (Monsoon Update) शक्यता वर्तवण्यात आली आहे.

  मुंबई: मान्सूनची (Monsoon Update) वाट बघणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. गेले काही दिवस खोळंबलेला मान्सून अरबी समुद्रातून (Arabian Sea) पुढे सरकला आहे. (Rain Update) मान्सूनच्या पुढच्या वाटचालीसाठी अनुकूल स्थिती निर्माण झाल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.

  हवामान विभागाच्या मते, नैऋत्य अरबी समुद्राचा काही भाग, आग्नेय अरबी समुद्राचा काही भाग मान्सूननं व्यापणार आहे. ईशान्य बंगालच्या उपसागराच्या काही भागातही मान्सून सक्रिय होण्याची शक्यता आहे.

  मान्सून अलर्ट
  हवामान विभागाने पुढील चार दिवस मुंबई, कोकण, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात मान्सून अलर्ट दिला आहे. पश्चिमेकडे निर्माण झालेलं कमी दाबाचं क्षेत्र आणि बंगालच्या उपसागरातील चक्रीय स्थितीमुळे देशातल्या बहुतेक राज्यात मान्सूनपूर्व सरी कोसळण्याचा अंदाज आहे.

  राज्यातही कोल्हापूरसह कोकण आणि विदर्भाच्या काही भागांत पुढील चार दिवस ढगांच्या गडगडाटासह आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. महाराष्ट्रातील काही भागात मान्सूनपूर्व पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. या पावसामुळं उष्णतेपासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे. तरी काही ठिकाणी वादळी वाऱ्यामुळं शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे.

  याशिवाय देशात येत्या ५ दिवसात कुठेही उष्णतेची लहर असणार नाही, असेही हवामान विभागाने म्हटले आहे. देशात केरळ, माहे आणि तामिळनाडूमध्ये २५ आणि २६ मे रोजी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. येत्या ५ दिवसांमध्ये केरळ, माहे आणि लक्षद्विप भागामध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस पडू शकतो. आंध्र प्रदेश, तेलंगाणा, कर्नाटक, तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि कराईकलमध्ये पुढच्या ५ दिवसांमध्ये काही भागांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.