“मनात प्रचंड चीड आणि सताप…, हे घृणास्पद कृत्य 140 कोटी भारतीयांसाठी निंदनीय व लज्जास्पद”, आरोपींना सोडणार नाही, पंतप्रधानांचा मणिपूर घटनेवरुन इशारा

आज माझे हृदय वेदनांनी भरले आहे, रागाने भरले आहे. मणिपूरची घटना ही कोणत्याही सुसंस्कृत समाजासाठी लाजिरवाणी घटना आहे. पाप करणारे कोण आहेत आणि किती आहेत हे बाजूला राहू द्या. आरोपींना सोडणार नाही, असा इशारा मोदींनी दिला आहे.

  नवी दिल्ली – गेल्या दोन महिन्यांपासून जातीय हिंसाचारात (Riot) जळत असलेल्या मणिपूरमधून (Manipur) एक धक्कादायक बातमी समोर आलीय. पुरुषांचा एक समूह दोन महिलांना (Womens) विवस्त्र करुन त्यांची रस्त्यावर धिंड काढत असल्याचं आणि त्यांना त्रास देत असल्याचा, त्या महिलांना स्पर्स करतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राज्यात तणाव आणखी वाढल्याचं सांगण्यात येतंय. या दोन महिलांची धिंड काढल्यानंतर, त्यांना शेतात नेऊन त्यांच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला, असाही आरोप करण्यात येतोय. हे प्रकरण सोशल मीडियावर चांगलंच तापलं असून, मणिपिूरमध्ये काय सुरुये, असा सवाल करण्यात येतोय. दरम्यान, यावर देशभरातून संतप्त प्रतिक्रिया समोर येत असताना, आता पंतप्रधानांनी यावर मौन सोडले असून, संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

  आरोपींना सोडणार नाही – पंतप्रधान

  केंद्र सरकार काय करतं, असा प्रश्न मणिपूर हिंसाचाराच्या निमित्तानं विरोधक सातत्यानं करीत आहेत. आता हा व्हिडीओ समोर आल्यानं यावरुन चांगलंच राजकारण तापण्याचीही शक्यता आहे. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी मणिपूरचे मुख्यमंत्री बिरेन सिंह यांना फोन करुन त्यांच्याशी चर्चा केल्याचं सांगण्यात येतंय. तर दुसरीकडे प्रियंका गांधी आणि अरविंद केजरीवाल या व्हिडीओनंतर आक्रमक झाले आहेत. यावर पंतप्रधान शांत कसे, असा सवाल विरोधकानी उपस्थित केला होता. यावर बोलताना मोदी म्हणाले की, आज माझे हृदय वेदनांनी भरले आहे, रागाने भरले आहे. मणिपूरची घटना ही कोणत्याही सुसंस्कृत समाजासाठी लाजिरवाणी घटना आहे. पाप करणारे कोण आहेत आणि किती आहेत हे बाजूला राहू द्या. आरोपींना सोडणार नाही, असा इशारा मोदींनी दिला आहे.

  140 कोटी भारतीयांसाठी लाजिरवाणी घटना…

  पुढे बोलताना मोदी म्हणाले की, मणिपुरची घटना संपूर्ण देशाला काळिमा फासणारी आहे. ‘हा अपमान संपूर्ण देशाचा आहे. 140 कोटी भारतीयांसाठी लाजिरवाणे आहे. मी सर्व मुख्यमंत्र्यांना कायदा आणि सुव्यवस्था मजबूत करण्यास सांगतो. माता-भगिनींच्या सुरक्षेसाठी कठोर पावले उचला, असं मोदी म्हणाले. तसेच माझं हृदय वेदनेनं भरून गेलं आहे. माझ्या मनात प्रचंड राग आहे. मुलींबाबत जे काही घडलंय त्यामुळे संपूर्ण देशाची मान खाली गेली आहे. ज्यांनी कुणी हे कृत्य केलंय त्यांना सोडणार नाही. त्यांना कठोर सजा देऊ, अशी संतप्त प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे.

  निंयनीय आणि माणुसकीशून्य…

  केंद्रीय मंत्री स्मृती इराणी म्हणाल्या आहेत की, मणिपूरमध्ये 2 महिलांचं होत असलेल्या लैंगिक शोषणाचा व्हिडीओ हा निंयनीय आणि माणुसकीशून्य आहे. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात चौकशी सुरु असल्याचं सांगितलं आहे. या प्रकरणातील आरोपींना अटक करुन त्यांना शिक्षा मिळेल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे.