चीनची परिस्थिती पाहून देशाला हादरा, देशात पुन्हा कोरोना निर्बंध लावणार? केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी बोलावली महत्त्वाची बैठक

    सध्या जगभरात पुन्हा कोरोनाने डोकं वर काढल्याच पाहायला मिळत आहे. चीनमध्ये तर कोरोनानं कहर केला असून यामुळे जगभरातील देशाची चिंता वाढली आहे. अशातच भारतातील कोरोनाच्या परिस्थितीबाबत आढावा घेण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी आज देशातंर्गत कोविड तयारीबाबत महत्त्वाची बैठक बोलावली आहे. त्यामुळे देशात कोरोनासंदर्भात नव्या गाईडलाईन्स किंवा खबरदारीचे उपाय जारी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

    कोरोनामुळे चीनची परिस्थिती बिघडल्याचं पाहायला मिळत आहे. चीनसह ( China ), ब्राझीलमध्ये ( Brazil ) पुन्हा एकदा कोरोना संसर्गाचा वेग वाढला आहे. जगभरातील कोरोना प्रादुर्भावाचा वेग पाहता भारत सरकारही अॅक्टीव्ब मोडवर आला आहाे.  या पार्श्वभुमीवर केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी आज देशातंर्गत कोविड तयारीबाबत महत्त्वाची बैठक बोलवली आहे. त्यामुळे देशात कोरोनासंदर्भात महत्त्वाची विषयांवर काही निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे.

    देशावर पुन्हा कोरोना निर्बंधाच सावट?

    एएनआय वृत्तसंस्थेना दिलेल्या माहितीनुसार,  केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांची  ही बैठक 11:30 वाजता सुरू होईल. या बैठकीमध्ये इतर देशांतील कोविड 19 परिस्थितींचाही आढावा घेण्यात येईल. यानंतर परिस्थिती पाहता नवे निर्बंध लागू होण्याबाबत निर्णय होऊ शकतो