विद्यार्थ्यांच्या प्रवेश रद्द प्रक्रियेबाबत युजीसीने दिले महत्त्वपूर्ण आदेश

एखाद्या विद्यार्थ्यास काही कारणास्तव जर आपला प्रवेश (Admission) रद्द करावा लागला तर विद्यापीठांनी ( cancellation of admission of students) अशा विद्यार्थ्यांचे संपूर्ण शुल्क (Fees) परत करावे, असे आदेश विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) सांगितले आहे.

नवी दिल्ली : पदवी अथवा पदव्युत्तर (Degree or postgraduate) अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या एखाद्या विद्यार्थ्यास काही कारणास्तव जर आपला प्रवेश (Admission) रद्द करावा लागला तर विद्यापीठांनी ( cancellation of admission of students) अशा विद्यार्थ्यांचे संपूर्ण शुल्क (Fees) परत करावे, असे आदेश विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) सांगितले आहे.

३० नोव्हेंबरपर्यंत ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेश रद्द केले आहेत. त्यांना या आदेशानुसार संपूर्ण शुल्क परत मिळणार असून जे विद्यार्थ्यी ३१ डिसेंबरपर्यंत प्रवेश रद्द करतील.त्यांना एक हजार रूपये प्रोसेसिंग फीकापून बाकीची रक्कम परत मिळेल.

कोरोना संकट तसेच इतरकाही कारणामुळे असंख्य पालकिंना आर्थिक तंगीचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर विद्यापीठ अनुदान आयोगाने वरील निर्णय घेतला आहे.